घरठाणेमुख्यमंत्री रोजगार योजनेतून नवउद्योगांना गती

मुख्यमंत्री रोजगार योजनेतून नवउद्योगांना गती

Subscribe

ठाण्यासह कोकणात 30 डिसेंबरपर्यंत सीएमईजीपी गतिमानता पंधरवडा

ठाण्यासह कोकण भागात नाविन्यपूर्ण संकल्पना आणि नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार योजना गतीमानता पंधरवडा सुरु करण्यात आला आहे. उद्योग विभागाचे विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी 30 डिसेंबरपर्यंत या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. मुख्यमंत्री रोजगार निमिर्ती योजनेचा हा पंधरवडा यशस्वी होण्यासाठी उद्योग संचालनालय आणि खादी व ग्रामोद्योग विभागाच्या अधिनस्त सर्व महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्राच्या कर्मचारी आणि जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी – कर्मचारी सरसावले आहेत. या अंतर्गत सर्व महाविद्यालये, अभियांत्रिकी महाविद्यालयात तसेच शासकीय, खाजगी आयटीआय, अशासकीय संस्था येथे योजनेचे जनजागृती मेळावे, प्रचार आणि प्रसिद्धी आयोजित करून पात्र लाभार्थ्याचे जागेवर अर्ज भरून घेण्याचे कार्यवाही करावी.

हे अर्ज तात्काळ पोर्टलवर अपलोड करणे. प्रशिक्षण देणार्‍या संस्थांना एमसीईडी, मिटकॉन, आरसेटी,स्किल डेव्हलपमेंट मधील तरुण-तरुणींना या योजनेची माहिती द्यावी. महिला मेळावे घेणे ज्यामध्ये महिला आर्थिक विकास महामंडळ, उमेद, महिला बचत गट यांना संपर्क साधून महिलांना प्राधान्याने या योजनेत सहभागी होण्यासाठी कृती आराखडा तयार करून काम करण्यात येणार आहे. तसेच, जिल्ह्यातील सर्व महामंडळे आणि एनजीओ यांना संपर्क साधून लाभार्थी योजनेत सहभागी करून घेणे. एक बँक – एक प्रकरण यासाठी सर्व. बँक मॅनेजर यांना संपर्क करून योजनेत सहभाग वाढविणे. एक गाव किमान एक प्रकरण या प्रमाणे काम करणे. एक जिल्हा एक वस्तू याप्रमाणे जिल्ह्यातील उद्योगांना प्राधान्य देणे. औद्योगिक समूह योजनेतील लाभार्थीना लाभ देण्यात येणार आहे.

- Advertisement -

कोकणातील सर्व पाच जिल्ह्यांमध्ये बँकाकडे प्रलंबित प्रकरणाबरोबर लक्षांकाच्या दोन ते अडीच पट प्रकरणे बँकांना पुढील पंधरा दिवसात पाठविण्याची कार्यवाही पूर्ण करणे. डिसेंबर अखेरपर्यंत 50 टक्के मंजुरीचे उदिष्ट व 25 टक्के क्लेम सादर करण्याची कार्यवाही पूर्ण करण्याचे निश्चित केले आहे. महाव्यवस्थापक व जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांनी एकत्रित या मोहिमेस यशस्वी करण्यासाठी सर्वातोपरी प्रयत्न करण्याच्या सूचना कोकण विभागीय उद्योग सहसंचालक श्रीमती विजू शिरसाठ यांनी दिल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -