घरठाणेमातीचा भराव टाकून खारफुटी नष्ट करण्याचा प्रयत्न

मातीचा भराव टाकून खारफुटी नष्ट करण्याचा प्रयत्न

Subscribe

मेरीटाईम बोर्ड, महसूल विभाग, केडीएमसी प्रशासनाचे दुर्लक्ष

डोंबिवली । खाडी किनारी असलेल्या कांदळवन, खारफुटी जंगलाची कत्तल करण्यास मनाई आहे.मात्र डोंबिवली पश्चिमेतील उल्हास खाडी किनार्‍यावरील देवीचा पाडा जेट्टी जवळ जेसीबीच्या सहाय्याने बिनधास्तपणे मातीचा भराव टाकून खारफुटी नष्ट करण्याचा प्रकार दिवसाढवळ्या सुरु आहे.अनधिकृत बांधकामे करण्यासाठी भूमाफिया अशा प्रकारे मातीचा भराव टाकून खाडी किनारा बुजविण्याचे काम सुरु आहे.वास्तविक खारफुटीची वनस्पती ही पूर संरक्षक असल्याने त्या घनदाट जंगलाचे संरक्षण करण्याची जबाबदारी सरकारी यंत्रणांची आहे. मात्र दिवसाढवळ्या खाडी किनारी मातीचे भराव टाकून खाडी पात्र बुजविण्यात येत असताना देखील केडीएमसी, महसूल विभाग आणि महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड प्रशासनाने दुर्लक्ष चालविल्याने पर्यावरण प्रेमी नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

डोंबिवली पश्चिमेला कोपर, जुनी डोंबिवली, मोठागाव, देवीचापाडा, गरीबाचा वाडा, कुंभारखाण पाडा, गणेशनगर असा सुंदर खाडी किनारा लाभला आहे. खाडी किनार्‍यावरील जमीन हरितपट्टा म्हणून ओळखली जाते. या हरित पट्ट्यात बांधकामे करता येत नाहीत. या हरित पट्ट्यात कांदळ वन अर्थात खारफुटीचे जंगल आहे. खारफुटीचे जंगल पूर संरक्षक म्हणून गणले जाते. यामुळे त्या जंगलांची कत्तल करण्यास न्यायालयाने मनाई केलेली आहे. मात्र आता बेकायदा बैठ्या चाळींची बांधकामे करणार्‍या येथील भूमाफियांची नजर आता या मोकळ्या राहिलेल्या हरित पट्ट्यावर पडली आहे. गेल्या आठवडाभरापासून डम्परने माती आणून जेसीबीच्या सहाय्याने खाडी किनारा माती टाकून बुजविला जात आहे.
गेल्या वर्षी देखील देवीचापाडा खाडी किनारच्या जेट्टी भागातील खारफुटीची जुनाट झाडे माफियांनी तोडून टाकली होती. शहरात मोकळ्या जागा नसल्याने नागरिकांच्या सोयीसाठी ,पर्यावरण संवर्धनासाठी हरितपट्टे विकसित करा, असे आवाहन नुकतेच आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी केले आहे.मात्र त्यांच्या आवाहनाला प्रशासनातील अधिकारीच दाद देत नाहीत. कुंभारखाणपाडा, देवीचापाडा हरितपट्ट्यात आजही मोठ्या प्रमाणात बेकायदा चाळी, इमारतींची बांधकामे सुरू आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -