घरठाणेठाण्यात बाळासाहेबांची शिवसेनेचा जल्लोष

ठाण्यात बाळासाहेबांची शिवसेनेचा जल्लोष

Subscribe

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला शिवसेना हे नाव  आणि धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाने दिल्यानंतर ठाण्यातील आनंद आश्रम येथे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येत जल्लोष केला.  यावेळी खासदार डॉ श्रीकांत शिंदे, पक्षाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांच्यासह आदी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. तसेच शिवसैनिकांसमवेत ‘धनुष्यबाण’  असलेले स्मृतिचिन्ह खासदार शिंदे यांनी उचलून जल्लोष केला.

यावेळी बोलताना, खासदार डॉ शिंदे यांनी हा सत्याचा आणि लोकशाहीचा विजय झाला आहे. तसेच हिंदुत्वाचा आणि बाळासाहेबांच्या विचाराचा विजय आहे. शिंदे साहेबांनी वयाच्या १६ व्या वर्षांपासून शिवसेना संघटना दिघे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली वाढवली.तसेच आम्ही पहिल्या दिवसांपासून शिवसेना आणि धनुष्यबाण आमचा आहे हे म्हणत होतो. अखेर आमचा विजय झाला आहे. तर प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी बोलताना, सर्व शिवसैनिक या निर्णयामुळे खुश झाले आहे. काही जणांनी शिवसेना ही राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या पायाखाली नेली होती. तेथून आता शिवसेना मुक्त झाली आहे. तर खासदार संजय राऊत यांनी शिवसेना संपविण्याची सुपारी घेतली होती. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कॅप्टन शीप घेतल्याने शिवसेना वाचली आहे. असे ते शेवटी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -