घरठाणेआमदार आव्हाडांना दिलासा,अंतरिम जामीन मंजूर

आमदार आव्हाडांना दिलासा,अंतरिम जामीन मंजूर

Subscribe

चौघांना येत्या सोमवारपर्यंत पोलीस कोठडी

महापालिका मुख्यालय अतिक्रमण सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्या मारहाणीप्रकरणी अटकेची टांगती तलवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर होती. मात्र, आमदार आव्हाड यांचा शुक्रवारी ठाणे न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केल्याने दिलासा मिळाला आहे. आव्हाड यांनी कट रचून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने कार्यकर्त्यांमार्फत मारहाण केली असे आहेर यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले होते. त्यानुसार आव्हाड यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल झाला होता. तर चौघांना नौपाडा पोलिसांनी अटक केली होती. त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी मिळाली होती. त्या चौघांचीही शुक्रवारी न्यायालयाने येत्या सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

डाॅ.जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कुटुंबाला संपवण्यासाठी तिहार जेलमध्ये असलेला गँगस्टर बाबाजी उर्फ सुभाषसिंग ठाकूर याच्या मदतीने शूटर तैनात केले अशी ठामपातील अधिकारी महेश आहेर यांच्या आवाजातील ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यानंतर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी पालिका अधिकारी आहेर यांना महापालिका मुख्यालयाच्या मागील गेट क्रमांक ४ च्या बाहेर बेदम मारहाण केली. आमदार आव्हाड यांच्यासह सहा जणांवर कट रचून जीवे ठार मारण्याचा उद्देशाने मारहाण केल्याप्रकरणी  गुन्हा दाखल झाला. तसेच त्यावेळी चौघांना पोलिसांनी अटक केली. त्यानंतर आव्हाडांवर अटकेची टांगती तलवार होती. त्यांनी शुक्रवारी अटकपूर्व जमीन अर्ज ठाणे न्यायालयात केला. तर त्यांना अंतरिम जमीन मंजूर झाला आहे. तर चौघांना येत्या सोमवारपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -