घरठाणेचार प्रभागातील बेकायदा बांधकामावर धडक कारवाई

चार प्रभागातील बेकायदा बांधकामावर धडक कारवाई

Subscribe

महापालिका आयुक्त डॉ.इंदुराणी जाखड यांचे निर्देशानुसार 5 ड प्रभागाचे सहा. आयुक्त धनंजय थोरात यांनी कल्याण पूर्व 100 फुटी रोड लगतच्या आरक्षित भूखंडावर उभारण्यात आलेल्या 3 अनधिकृत ढाबे आणि 2 शेड्सवर धडक कारवाई नुकतीच केली. कारवाई अतिक्रमण पथकाचे कर्मचारी, महापालिका पोलिस कर्मचारी यांच्या मदतीने आणि एका जेसीबीच्या सहाय्याने करण्यात आली. तसेच 7 ह प्रभागाच्या सहा. आयुक्त स्नेहा करपे यांनी रेल्वे लाईन समांतर रोड मोठागाव ठाकुर्ली ते कोपर रोड ( 18 मीटर रुंद ) रस्त्यामधील बाधित होणार्‍या 3 अनधिकृत दुकान गाळयांवर धडक कारवाई केली. ही कारवाई अधिक्षक अरुण पाटील, अतिक्रमण निमुर्लन पथक, महापालिकेचे पोलीस कर्मचारी, एक जेसीबी, 2 गॅस कटर, यांच्या सहाय्याने करण्यात आली.

8/ग प्रभागाच्या सहा.आयुक्त सोनल देशमुख यांनी डोंबिवली पूर्व येथील आयरे रोड, कोपर रेल्वे लाईन जवळ कृष्णा मढवी, होडी बंगला यांच्या तळ अधिक 7 मजली इमारतीच्या अनधिकृत बांधकामांवर एक गॅस कटर आणि एका ब्रेकरच्या सहाय्याने धडक कारवाई केली. नऊ आय प्रभागाच्या सहा. आयुक्त हेमा मुंबरकर यांनी दावडी येथील जुनी रिजन्सी येथे प्रस्तावित डीपी रोडवरील अनधिकृत चाळीचे बांधकाम जमीनदोस्त केले. ही कारवाई अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे कर्मचारी व फेरीवाला पथक , एक जेसीबी, दोन ब्रेकर, हातोडा, घण, एक पोकलन यांच्या सहाय्याने करण्यात आली.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -