Eco friendly bappa Competition
घर ठाणे संजय राऊत यांना मनोरुग्णालयात दाखल करण्याची मागणी

संजय राऊत यांना मनोरुग्णालयात दाखल करण्याची मागणी

Subscribe

बेताल व निराधार वक्तव्याने समाजात फुटीची बीजे रोवत समाजाच्या भावना भडकाविणाऱ्या शिल्लक सेनेचे खासदार संजय राऊत यांची मानसिक स्थिती ढासळली असून, त्यांना तातडीने मनोरुग्णालयात दाखल करावे, अशी मागणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाचे अधीक्षकांकडे केली आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मनोरुग्णालयाच्या अधीक्षकांची भेट घेतली. तसेच त्यांना निवेदन दिले. या वेळी माजी नगरसेवक भरत चव्हाण, जयेंद्र कोळी, गुलाब झा, सुनील कोळपकर, सचिन सावंत, सूरज दळवी, नरेश ठाकूर, रिंकू विश्वकर्मा, शीतल कारंडे, तृप्ती पाटील, अपर्णा ताजणे, वर्षा पाटील, स्नेहा पाटील, वृषाली वाघुले-भोसले, तृप्ती सुर्वे, सई करूळकर, नताशा सोनकर, वैशाली विधाटे, भारती शर्मा, पूनम शर्मा, आरती अभ्यंकर आदींची उपस्थिती होती.
महाराष्ट्राच्या राजकारणात नावापुरत्या  असलेल्या शिल्लक सेनेचे खासदार संजय राऊत यांच्याकडून सातत्याने बेताल व निराधार वक्तव्ये केली जात आहेत. केवळ प्रसारमाध्यमांत प्रसिद्धी करण्यासाठी नाहक टिप्पणी केल्या जात आहेत. तसेच महाराष्ट्रातील विविध लोकप्रिय व्यक्तिमत्व आणि विविध समाजांविरोधात वक्तव्य करून समाजात दुही पसरविणे व समाजाच्या भावना भडकविण्याचे उद्योगही संजय राऊत यांच्याकडून केले जात आहेत. काही दिवसांपूर्वी राज्यातील लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात लिहिलेल्या अग्रलेखाविरोधात राज्यभरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या, याकडे संजय वाघुले यांनी निवेदनात लक्ष वेधले आहे.

गेल्या काही वर्षात संजय राऊत यांच्याकडून अनेक जबाबदार वक्तव्य करण्यात आली असून, त्यातील काही वक्तव्ये पुढीलप्रमाणे आहेत. महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांकडे पुरावा मागणे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याला लक्ष्य करणे, मराठा समाजाच्या मोर्चावर टीका करणे, गुजराती समुदायावर टीका, विधिमंडळावर टीका, गुवाहाटीला गेलेल्या आमदारांची जिवंत प्रेते आल्यानंतर शवागृहात पोस्टमार्टम करणार, राज्य सरकार बेकायदा असून त्यांचा आदेश पोलिसांनी पाळू नये, अत्याचार पीडीत मुलीचे आक्षेपार्ह फोटो ट्विट करणे, केंद्रीय निवडणूक आयोगाला शिवीगाळ करणे आदी वक्तव्ये लक्षात घेता संजय राऊत यांचे मानसिक संतुलन ढासळले असल्याचे स्पष्ट होत आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांच्यावर मानसिक उपचार करण्याची गरज आहे तरी ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाने संजय राऊत यांना रुग्णालयात दाखल करण्यासंदर्भात तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -