Eco friendly bappa Competition
घर भविष्य आजचे राशीभविष्य राशीभविष्य : मंगळवार २२ ऑगस्ट २०२३

राशीभविष्य : मंगळवार २२ ऑगस्ट २०२३

Subscribe

मेष : आप्तेष्ठांची मदत घेता येईल. सामुदायीक चर्चा करताना प्रसंगावधान ठेवा. ग्राहकांबरोबर गोड बोला. धंदा होईल.

- Advertisement -

वृषभ : वरिष्ठांच्या बरोबर काम करावे लागेल. घरगुती कामे न झाल्यास घरातील व्यक्ती नाराज होतील. धंदा मिळेल.

मिथुन : नोकरीत नम्रपणे तुमचे मत व्यक्त करा. नवीन ओळखी होतील. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगतीची संधी मिळेल.

- Advertisement -

कर्क : रागाच्या भरात जवळच्या व्यक्तीशी वाद वाढू शकतो. खाण्याची काळजी घ्या. वाहन जपून चालवा.

सिंह : तुमच्यावर दबाव राहील. नोकरीत काम वाढेल. धंद्यात काम मिळेल. थकबाकी वसूल करता येईल.

कन्या : सामाजिक कार्यात प्रतिष्ठा मिळेल. आपसांत गैरसमज होण्याची शक्यता आहे. तुमच्या कार्याला दिशा मिळेल. यश मिळेल.

तूळ : तुमच्या प्रत्येक कार्यात यश मिळेल. धंद्यात वाढ होईल. नवीन परिचय झाल्याने तुम्हाला नवीन प्रेरणा मिळेल. प्रतिष्ठा मिळेल.

वृश्चिक : प्रवासात अडचण येऊ शकते. सावध रहा. आपल्याबरोबर चांगले मित्र ठेवा. धंद्यात नवे काम होईल. कलेत चमकाल.

धनु : घरातील प्रश्नावर चर्चा सफल होईल. कला-क्रीडा क्षेत्रात तुमचे कौतुक होईल. मैत्री होईल. नोकरीत सावध रहा.

मकर : क्षुल्लक कारणाने घरात तणाव होईल. खाण्याची काळजी घ्या. नवीन ओळखीवर जास्त विश्वास ठेवू नका. वस्तू सांभाळा.

कुंभ : व्यवसायात फायदा होईल. तुमचा विचार प्रभावी ठरेल. मान-सन्मान मिळेल. आप्तेष्ठांची भेट होईल.

मीन : धंद्यात जम बसेल. कला-क्रीडा-साहित्यात चमकाल. वाहन जपून चालवा. रागावर ताबा ठेवा. यश मिळेल.

- Advertisment -