घरठाणेआपत्काळाच्या तालमीसाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज

आपत्काळाच्या तालमीसाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज

Subscribe

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांची माहिती

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने घेण्यात येणार्‍या चक्रीवादळ व अनुषंगिक आपत्ती विषयक चाचणी आणि सामुहिक राज्यस्तरीय प्रात्यक्षिकासाठी ठाणे जिल्ह्यातील सर्व आपत्ती व्यवस्थापन दल, विविध विभागाच्या यंत्रणा सज्ज असून प्रात्यक्षिक यशस्वी होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी आज येथे व्यक्त केले. चक्रीवादळ व अनुषंगिक आपत्तीविषयक चाचणी व सामूहिक राज्यस्तरीय प्रात्यक्षिकाच्या अनुषंगाने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे कमांडट आदित्यकुमार यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय नियोजन बैठक दूरदृश्यप्रणालीद्वारे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ठाणे जिल्ह्यातील प्रात्यक्षिकाचा आढावा शिनगारे यांनी घेतला.
यावेळी उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा, तहसिलदार संजय भोसले, अंबरनाथ तहसिलदार प्रशांती माने, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. अनिता जवंजाळ यांच्यासह जिल्ह्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्था, महसूल, आरोग्य, अग्निशमन, पोलीस दलाचे अधिकारी उपस्थित होते.

चक्रीवादळ व अनुषंगिक आपत्ती विषयक चाचणी व सामूहिक राज्यस्तरीय प्रात्यक्षिकाच्या अनुषंगाने ठाणे जिल्ह्यात 9 नोव्हेंबर 2023 रोजी भिवंडी तालुक्यातील पडघा गाव आणि गोडावून, कल्याण तालुक्यातील मोठागाव-ठाकुर्ली एमआयडीसीतील केमिकल कंपनी व अंबरनाथ तालुक्यातील अंबरनाथ येथील केमिकल कंपनीमध्ये रंगीत तालीम होणार आहे. या तालिमीच्या दृष्टीने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, आरोग्य यंत्रणा, अग्निशमन यंत्रणा तसेच महसूल यंत्रणा सज्ज झाली आहे. आपत्तीत अडकलेल्या नागरिकांची सुटका करणे, आपत्ती ग्रस्त भागातील नागरिकांचे स्थलांतर, त्यांच्या तात्पुरत्या निवास व भोजनाची व्यवस्था, बचाव पथके, आणीबाणीच्या काळातील संपर्क यंत्रणा आदी सर्व तयारी झाली आहे. तसेच आपत्ती काळात लागणारे साहित्य उदा. लाईफ जॅकेट, रबरी होड्या, यांत्रिक बोटी, टॉर्च, जनरेटर, संपर्क यंत्रणा, जेसीबी, काँक्रिट कटर आदी सज्ज ठेवण्यात आले आहे. औद्योगिक कंपनीमध्ये एखादी घटना घडल्यास करावयाच्या आवश्यक कार्यवाहीसंदर्भात संबंधित यंत्रणांना सविस्तर माहिती देण्यात आली असून संबंधित अधिकार्‍यांना जबाबदारी नेमून देण्यात आली असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -