घरमहाराष्ट्रनागपूरतेव्हा देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री केलं असतं तर...; मराठा आरक्षणाबाबत बावनकुळेंचे सूचक विधान

तेव्हा देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री केलं असतं तर…; मराठा आरक्षणाबाबत बावनकुळेंचे सूचक विधान

Subscribe

राज्यात पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी अशी चित्रे उभे राहत असल्याचे चित्र आहे. कारण, मंत्रिमंडळात असूनही छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला देण्यात येणाऱ्या कुणबी जात प्रमाणपत्राचा धागा पकडत सरकारवर हल्ला चढवला आहे.

नागपूर : राज्यात पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी अशी चित्रे उभे राहत असल्याचे चित्र आहे. कारण, मंत्रिमंडळात असूनही छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला देण्यात येणाऱ्या कुणबी जात प्रमाणपत्राचा धागा पकडत सरकारवर हल्ला चढवला आहे. अशातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांनी याच मराठा आरक्षणावर बोलताना ते म्हणाले, त्यावेळी फडणवीसांना मुख्यमंत्री केले असते तर मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला असता. त्यांच्या वक्तव्याची सध्या चर्चा होत आहे. (If Devendra Fadnavis had been made Chief Minister then… Indicative statement of Bawankules regarding Maratha reservation)

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मंगळवारी (7 नोव्हेंबर) नागपूर दौऱ्यावर असताना ते म्हणाले की, 2019 मध्ये निवडणूक निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विरोध केला नसता आणि त्यांना मुख्यमंत्री होऊ दिले असते तर फडणवीस यांनी मराठा आरक्षणाची याचिका सर्वोच्च न्यायालयात टिकवण्यासाठी प्रयत्न केले असते. एवढेच नव्हे तर मराठ्यांना आतापर्यंत आरक्षणही मिळाले असते असा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी करत उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला.

- Advertisement -

हेही वाचा : MAHARASHTRA CABINET MEETING : राज्य सरकार धनगर समाजासाठी ‘ही’ घोषणा करण्याची शक्यता

छगन भुजबळांच्या भूमिकेबाबतही केला खुलासा

मागील दोन दिवसांपासून छगन भुजबळ मराठा समाजाला देण्यात येणाऱ्या कुणबी जात प्रमाणपत्रावरून आक्रमक होताना दिसत आहेत. त्यांनी थेट माध्यमांपुढे येत त्यांची भूमिका विषद केली. तर आज मंगळवारी (7 नोव्हेंबर) त्यांच्याच निवासस्थानी ओबीसी नेत्यांची बैठकही पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी स्वतः भुजबळ होते. एकीकडे हे सगळं सुरू असताना दुसरीकडे चंद्रशेखर बावनकुळे यांनी भुजबळांची भूमिका नागपुरात बोलताना विषद केली. ते म्हणाले की, मराठा आरक्षणाबाबत जी सर्वपक्षीय नेत्यांची भूमिका होती तीच भुजबळांचीही होती. तेच ते आताही बोलत आहेत असे म्हणत देवेंद्र फडणवीस हे मराठा आरक्षण देण्यासाठी वचनबद्ध असल्याचाही पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला.

- Advertisement -

हेही वाचा : सीमेवरील घुसखोरी आणि तस्करीला आता मधमाशांचा डंख; बीएसएफचा अनोखा प्रयोग

कुणाच्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही

मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्यावरून आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावल्या जात आहे असा आरोप केल्या जातो. मात्र, तसे काहीही नसून, कुणाच्याही आरक्षणाला धक्का लागणार नसल्याचे बावनकुळे म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -