घरठाणेपहिला ‘मुक्तायन’ नाट्यमहोत्सव शनिवारपासून मुंबईत

पहिला ‘मुक्तायन’ नाट्यमहोत्सव शनिवारपासून मुंबईत

Subscribe

‘अस्तित्व संस्था ठाणे’ पुरस्कृत ‘उन्मुक्त कलाविष्कार’ या नाट्यसंस्थेने पहिला ‘मुक्तायन’ नाट्यमहोत्सव-2023 हा येत्या ८ व ९ जुलै या दोन दिवस शिवाजी मंदिर नाट्यगृह, दादर येथे आयोजित करण्यात येणार आहे. या महोत्सवात नाट्यरसिकांसाठी वेगवेगळ्या विषयांवर आधारित नाटकांचे व एकांकिकाचे सादरीकरण करण्यात येणार आहे. या नाट्य महोत्सवासाठी आपलं महानगर वर्तमानपत्राचे संपादक संजय सावंत, मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघाचे प्रमुख कार्यवाह राहुल भंडारे, कथाकार आणि ज्येष्ठ नाटककार असगर वजाहत आणि ज्येष्ठ नाटककार आणि लेखक प्रेमानंद गज्वी यांची प्रमुख उपस्थिती आहे.

या नाट्य महोत्सवात शिल्पा सावंत (उर्मी) लिखित, दिग्दर्शित तीन एकांकिका आणि चार नाटकांचे सादरकरण होणार आहे. दोन दिवस हा महोत्सव आयोजित करण्यात आला असून यावेळी नाट्य, पत्रकारिता, साहित्य आणि कला क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहाणार आहेत. आठ तारखेला सकाळी नऊ वाजता दिपप्रज्वलन होऊन महोत्सवाला सुरुवात होणार आहे. त्यानंतर प्रमुख मान्यवर आपले मनोगत व्यक्त करतील. पहिल्या दिवशी बार्बी डाॅल, चांदणी रात्र आणि कागदी फूल या दोन एकांकिका, सायंकाळी डेस्टीनेशन वेडिंग हा नाट्यानुभव सादर होणार आहे. नऊ जुलै रोजी सकाळी साडे दहा वाजता पोस्ट मार्टम हे नाटक, बुलडोझर, काळोखाच्या छटा या एकांकिका तर सायंकाळी अंधे जहाँ के अंधे रास्ते हे बहुचर्चित नाटक सादर केले जाणार आहे. या नाट्यमहोत्सवाच्या तिकिटांसाठी विनायक 8407981816/ शिल्पा 9324404067/सुमीत 97698 84834 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -