घरठाणेकल्याण पूर्वेत भाजप-शिवसेनेचे मनोमिलन

कल्याण पूर्वेत भाजप-शिवसेनेचे मनोमिलन

Subscribe

भाजप आमदार गणपत गायकवाड समर्थक, भाजप कार्यकर्त्यांची समजूत काढण्यात यश

कल्याण । कल्याण पूर्वेत भाजप शिवसेनेचे मनोमिलन होत वादावर पडदा पडला आहे. भाजप आमदार गणपत गायकवाड समर्थक आणि भाजप कार्यकर्त्यांची समजूत काढण्यात यश आले आहे. भाजप आणि गणपत गायकवाड समर्थकांनी श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा दिला असून याबाबत भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या कार्यालयात भाजप जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली. यावेळी बोलतांना सूर्यवंशी यांनी सांगितले की, कल्याण लोकसभा मतदार संघ भाजपला मिळावा अशी कार्यकर्त्यांची मागणी होती ती गैर नव्हती. मात्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवायचे असून देवेंद्र फडणवीस यांनी श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीची घोषणा केली त्या भूमिकेचं स्वागत केल्याचे ते म्हणाले.

याबाबत गणपत गायकवाड यांनी भूमिका कार्यकर्त्याना कळवली असल्याचे ते म्हणाले. गणपत गायकवाड यांच्या भूमिकेचं सर्व कार्यकर्त्यांनी समर्थन केले असल्याची माहिती सूर्यवंशी यांनी दिली. भाजपच्या कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या तो त्यांचा अधिकार आहे. त्यांनी बैठक घेतली आणि घोषणा केल्या, त्या अर्थी ते गुंड होत नाहीत. जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत मतदारसंघ आपल्याला मिळावा, अशी मागणी करणे गैर नाही असेही त्यांनी सांगितले. तर शिवसेनेच्या दीपेश म्हात्रे यांनी भाजपा बद्दल नाही बोलायला पाहिजे असा सल्ला भाजपा जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांनी दिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -