घरठाणेमहेश आहेर यांच्याकडील अतिक्रमण विभागाचा कार्यभार अबाधीत

महेश आहेर यांच्याकडील अतिक्रमण विभागाचा कार्यभार अबाधीत

Subscribe

कार्यालयीन अधिक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार काढला

ठाणे महापालिकेतील वादग्रस्त सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांची चौकशी होईपर्यंत त्यांचे कार्यभार काढण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार त्यांच्याकडील आस्थापना विभागातील कार्यभार काढण्यात आला असून अतिक्रमण विभागाचा कार्यभार तसाच ठेवण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीकडून आहेर यांची कथीत ऑडीओ क्लिप व्हायरल करण्यात आली होती. यात आव्हाड यांच्या कुटुंबियांना जिवे मारण्याची धमकी त्यात देण्यात आली होती.

या ऑडीओ क्लिपनंतर राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी आहेर यांना महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर माहराण केली होती. त्यानंतर आव्हाड यांच्यासह त्यांच्या काही पदाधिकार्‍यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर आहेर यांच्या विरोधात कारवाईची मागणी देखील राष्ट्रवादीने पोलिसांकडे केली होती. परंतु तरी देखील त्यांची साधी चौकशी देखील करण्यात आली नव्हती. याचदरम्यान या संदर्भात काँग्रेसचे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी देखील आपल्या कुटुंबियांना आहेर यांच्याकडून धोका असल्याचे सांगितले होते. तर या संदर्भात अधिवेशनात देखील चर्चा झाली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशी सीआयडीमार्फत केली जाईल असे आश्वासन दिले होते. तर चौकशी होईपर्यंत त्यांचा पदभार काढण्याचे आश्वासनही अधिवेशनात देण्यात आले होते. त्यानुसार ठाणे महापालिकेने त्यांच्याकडील कार्यालयीन उप अधिक्षक व त्यांच्याकडे असलेले कार्यालयीन अधिक्षक या पदाचा असलेला अतिरिक्त कार्यभार काढून घेतला आहे. परंतु त्यांच्याकडील अतिक्रमण विभागाचा सहाय्यक आयुक्त पदाचा कार्यभार तसाच ठेवला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -