घरठाणेठामपाच्या कोपरी प्रसूतिगृहात 18 पेट्यांचे विशेष नवजात केअर युनिट!

ठामपाच्या कोपरी प्रसूतिगृहात 18 पेट्यांचे विशेष नवजात केअर युनिट!

Subscribe

आई बाळाची ताटातूट टळणार

ठाणे महापालिकेचे ठाणे कोपरी पूर्व येथील शेठ लक्ष्मीचंद फतीचंद प्रसूतिगृहात चार स्त्रीरोग तज्ज्ञांच्या नियुक्तीसह 18 पेट्यांचे विशेष नवजात केअर युनिट (एसएनसीयू) उभारण्यास महापालिकेने मंजूरी दिली आहे. या निर्णयामुळे वेळेआधी जन्म येणार्‍या व कमी वजनाच्या मुलांवर लगेचच उपचार मिळणार आहेत. त्यामुळे नवजात केअर युनिटसाठी करावी लागणारी पायपीट थांबण्यास मदत होणार असून नव्या ॠएसएनसीयू’ युनिटमुळे माय-लेकाची ताटातूट टळणार आहे.
कोपरी येथील शेठ लक्ष्मीचंद फतीचंद प्रसूतिगृहाला विविध समस्यांनी ग्रासलेले होते.

याबाबत अनेक तक्रारी देखील पालिका प्रशासनाकडे यापूर्वी प्राप्त झाल्या होत्या. याची गांभीर्याने दाखल घेत, पालिका प्रशासनाने या प्रसुतीगृहाचे कायपालट करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार टप्याटप्याने या प्रसूतीगृहात पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याबरोबरच येथ्गील समस्या सोडवीत अत्याधुनिक साधन सामुग्री उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येत आहे. त्यातच या प्रसूतिगृहात ॠएनआयसीयू’ युनिट सुरू केले नव्हते. त्यामुळे वेळेआधी व कमी वजनाच्या मुलांना कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात हलवावे लागत होते. तर काही गरीब पालकांना कर्ज काढून, नवजात मुलाला खासगी हॉस्पिटलमधील ॠएनआयसीयू’ दाखल करावे लागत होते. काही वेळा पॅनलवरील डॉक्टर वेळेत न आल्यामुळे मुलांवरील उपचाराला अडचणी येत होत्या.

- Advertisement -

या संदर्भात माजी नगरसेवक भरत चव्हाण यांनी पालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांची भेट घेऊन लक्ष्मीचंद फतीचंद प्रसूतिगृहात विशेष नवजात केअर युनिट (एसएनसीयू) युनिट उभारण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार आयुक्त बांगर यांनी कोपरीतील ॠएसएनसीयू’साठी अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. या ठिकाणी चार स्त्री रोग तज्ज्ञांच्या नियुक्तीसह 18 पेट्यांचे ॠएसएनसीयू’ युनिट उभारले जाईल, अशी माहिती भरत चव्हाण यांनी दिली. लक्ष्मीचंद फतीचंद प्रसूतिगृहात मातेची प्रसूती झाल्यानंतर कमी वजन व आजारी नवजात बालकांना छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलमध्ये हलविले जात होते. त्यावेळी माता कोपरीत, तर लेक कळव्याला अशी स्थिती निर्माण होत होती. अशा परिस्थितीत मातेच्या जीवाची घालमेल होत होती. तर नातेवाईकांची दोघांची काळजी घेताना धावपळ उडत होती. कोपरीत नव्याॠएसएनसीयू’ युनिटमुळे माय-लेकाची ताटातूट टळणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -