घरठाणेमहेश गायकवाड यांचा रुग्णालयातील डिस्चार्ज लांबला

महेश गायकवाड यांचा रुग्णालयातील डिस्चार्ज लांबला

Subscribe

 कार्यकर्त्यांनी केली होती स्वागताची जय्यत तयारी 

कल्याण पूर्वेतील भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर उल्हासनगर येथील हिल लाईन पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या केबिनमध्ये गोळ्या झाडल्या होत्या. त्या घटनेत गंभीर जखमी झालेल्या व उपचारानंतर तब्बल १३ दिवसांनी शुक्रवारी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार होता. कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली. सर्वत्र बॅनर लावण्यात आले होते. त्यांचे कार्यालय देखील सजवले पण डॉक्टरांनी  त्यांना अजून एक ते दोन दिवस आरामाची गरज असल्याने त्यांना आज डिस्चार्ज मिळणार नसल्याचे सांगितल्याने कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला.

कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांचा द्वारली गावातील जाधव कुटुंबीयांसोबत जमिनीचा वाद होता. यावेळी जमिनीच्या मालकांनी आमदारांनी आमची जमीन हडप केल्याचा आरोप त्यांच्यावर केला होता. आमदारांनी आम्ही त्याचे रीतसर पैसे दिल्याचे स्पष्ट सांगितले होते. या सगळ्या प्रकारानंतर जाधव कुटुंबीय आणि महेश गायकवाड यांची भेट घेतली आणि हे प्रकरण थेट पोलीस ठाण्यात गेले. त्यानंतर तेथे आमदार गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड देखील हजर झाला होता. यावेळी वैभवची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवून घेत नसल्याचे पाहताच त्यांनी घडलेल्या सर्व प्रकार आमदार गणपत गायकवाड यांना फोन लावून सांगितला. काहीच वेळात आमदार गणपत गायकवाड हे देखील पोलीस ठाण्यात हजर झाले.  यावेळी महेश गायकवाड आणि त्यांचे मित्र राहुल पाटील हे वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या केबिनमध्ये बसले होते. त्याच केबिनमध्ये आमदार गणपत गायकवाड देखील बसण्यासाठी गेले. पाच मिनिटं बसल्यानंतर पोलीस निरीक्षक अनिल जगताप बाहेर काय सुरू आहे ? हे पाहण्यासाठी गेले असतानाच आमदार गणपत गायकवाड यांनी स्वतःच्या रिव्हॉल्वर महेश गायकवाड यांच्यावर थेट गोळीबार सुरू केला. या गोळीबारात महेश गायकवाड यांना ६ गोळ्या लागल्याने ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना तेथून रुग्णालयात नेण्यात आले होते.

- Advertisement -

जखमी महेश गायकवाड यांची प्रकृती सुरुवातीला गंभीर होती. मात्र त्यानंतर त्यांची प्रकृती सुधारत गेली. तब्बल १३ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर ते शुक्रवारी रुग्णालयातून  घरी येणार असल्याची माहिती कार्यकर्त्यांना मिळाली. उत्साही कार्यकर्त्यांनी संपूर्ण शहरभर टायगर इज बॅक, भावी आमदार अशा आशयाचे बॅनर लावले.  त्यांच्या स्वागताची जंगी तयारी करण्यासाठी त्यांनी कार्यालय देखील सजवले होते.

रुग्णालयातील डॉक्टरांनी महेश गायकवाड यांची आज वैद्यकीय तपासणी केली.  डॉक्टरांनी चालण्याचा सराव करून घेतला. त्यावेळी महेश यांना चालण्यासाठी थोडा त्रास जाणवला. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी ऑपरेशन केले आहे, त्या ठिकाणी अजूनही सूज असल्याचे डॉक्टरांना दिसून आले. त्यामुळे शुक्रवारी होणारा त्यांचा डिस्चार्ज डॉक्टरांनी रद्द केला आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत डिस्चार्ज होण्याची शक्यता  आहे.

- Advertisement -

शिवसेना शिंदे गट अधिवेशन शिवसेना शिंदे गटाचे कोल्हापूर येथे अधिवेशन सुरू आहे. कल्याण,डोंबिवलीचे शिंदे गटाचे सर्वच नेते ,पदाधिकारी या अधिवेशनासाठी गेले आहेत. त्यामुळे त्यांचे जल्लोषात स्वागत करायला खासदार श्रीकांत शिंदे आणि इतर नेते नसल्याने हा डिस्चार्ज दोन दिवस पुढे ढकलल्याची देखील चर्चा आहे. कारण ज्या दिवशी गोळीबार झाला त्या दिवशी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनीच पुढाकार घेत महेश गायकवाड यांना उपचारासाठी ठाण्याच्या रुग्णालयात हलविण्यास सांगत सर्व यंत्रणा सज्ज केली होती .त्यांच्यावर शस्त्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ते रात्रभर काळजीने रुग्णालयात थांबले होते. वेळीच उपचार मिळाल्याने महेश यांचे प्राण वाचल्याचे कार्यकर्ते सांगत आहेत.  त्यामुळे त्यांचे स्वागत जल्लोषात होणार आहे. त्यावेळी  खासदार शिंदे देखील सहभागी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -