घरक्राइमCrime News : अवघ्या दहा रुपयांचा चहा चांगलाच महागात पडला...

Crime News : अवघ्या दहा रुपयांचा चहा चांगलाच महागात पडला…

Subscribe

बुलढाणा : गाडी उभी करून मित्रासह चहा पिण्यासाठी जाणे एका शिक्षकाला चांगलेच महागात पडले आहे. मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळी बसस्थानक परिसरात ही घटना घडली. येथे गाडी उभी करून हा शिक्षक चहा पिण्यासाठी गेला असता, त्यांच्या गाडीतून नऊ लाखांची रक्कम चोरट्यांनी लंपास केली. शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. संतोष मदनलाल लद्दड असे या शिक्षकाचे नाव आहे.

हेही वाचा – Maratha Reservation : जरांगे यांनी जपून रहावे, प्रकाश आंबेडकर का म्हणाले असं ?

- Advertisement -

मेहकर येथील स्टेट बँक शाखेतून लद्दड यांनी ९ लाख रुपये काढले. तेव्हापासूनच दोघेजण त्यांच्यावर पाळत ठेवून होते. मात्र, संतोष यांना हे कळले नाही. बँकेतून बाहेर पडताच या दोघा अज्ञातांनी त्यांच्या चारचाकीचा बेमालूमपणे पाठलाग केला.

हेही वाचा – Nilesh Rane : बाळासाहेबांच्या एका शब्दासाठी…; नीलेश राणेंनी सांगितली ‘ती’ आठवण

- Advertisement -

देऊळगाव माळी येथे ते मित्रांसोबत चहा पिण्यासाठी गेले. तीच वेळ साधत या अज्ञातांनी गाडीत ठेवलेली रोकड पळवली. हा प्रकार लक्षात येताच संतोष लद्दड हादरले. घटनेची माहिती मिळताच मेहकर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, दुचाकीस्वार त्यात दिसले. अधिक तपास पोलीस करत आहेत. यासाठी इतरत्र नाकाबंदी करण्यात आल्याचे सांगण्यात आले. सोबत मोठी रक्कम असेल तर काय काळजी घ्यावी, याबाबत पोलिसांकडून कितीही वेळा जनजागृती करण्यात आली, तरी जनता काही ते ऐकताना दिसत नाही. सावधानता बाळगत नाही. यातूनच मग अशा घटना घडतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -