घरठाणेठाण्यात एसटीच्या बसला आग; प्रवासी सुखरूप

ठाण्यात एसटीच्या बसला आग; प्रवासी सुखरूप

Subscribe

ठाणे: महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसच्या स्टार्टरमध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याची घटना शुक्रवारी सकाळी ९ वाजून ४९ मिनिटांच्या सुमारास समोर आली. या बसमधून प्रवास करणाऱ्या सुमारे-७० प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात यश आले असून बसला लागलेली आग बसमधील चालक, वाहक, स्थानिक रहिवाशी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान यांच्या मदतीने तातडीने नियंत्रणात आली आहे.

ठाणेकडून भिवंडीला जात असलेली महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भिवंडी डेपोची बस MH 14 BT 1897 ही बस चालक आनंद विठोबा सवारे आणि वाहक गणपत बाबुराव बिराजदार हे दोघे ७० प्रवासी घेऊन निघाले होते. बस टेंभीनाक्यावर येताच बसच्या स्टार्टरमध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागली.

- Advertisement -

स्थानिक माजी नगरसेवक सुधीर कोकाटे यांनी तातडीने याची माहिती ठाणे महापालिका प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दिली. तर बस चालक वाहक आणि स्थानिक नागरिकांनी बसमधील सुमारे ७० प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. तसेच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल झाल्यावर आगीवर तातडीने नियंत्रण मिळविले. वेळीच ही बाब लक्षात आल्याने मोठे अनर्थ टळला.


‘राजकुमार आता घराबाहेर पडले’; आदित्य ठाकरेंच्या पुणे – नाशिक दौऱ्यावर शिंदे गटाचा खोचक टोला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -