घरमहाराष्ट्रनाशिक'राजकुमार आता घराबाहेर पडले'; आदित्य ठाकरेंच्या पुणे - नाशिक दौऱ्यावर शिंदे गटाचा खोचक टोला

‘राजकुमार आता घराबाहेर पडले’; आदित्य ठाकरेंच्या पुणे – नाशिक दौऱ्यावर शिंदे गटाचा खोचक टोला

Subscribe

राज्यात शिंदे - फडणवीस सरकार येण्यापूर्वी 'महाविकासआघाडीचे सरकार होते. तेव्हा का नाही दौरे केले.

परतीच्या पावसाने संपूर्ण राज्यात धुमाकूळ घातला. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले. अशातच शवसेनेचे नेते आदित्य ठाकरे पुणेb(pune) आणि नाशिक (nashik) मध्ये परतीच्या पावसामुळे शेतीचे जे नुकसान झाले होते त्याची पाहणी कारण्यासाठी गेले होते. आदित्य ठाकरे (adityya thackeray) यांनी नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. दरम्यान आदित्य ठाकरे यांच्या या दौऱ्यावर शिंदे कडून मात्र जोरदार टीका करण्यात येत आहे.

शिंदे गटाचे म्हणजेच बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे. ‘असे कसे बरे दादा, नवलपरी घडले, राजकुमारही आता घराबाहेर पडले, अर्ध्या तासात शेतकऱ्यांची दैना पाहून झाली ‘नाईटलाईफ’ साठी स्वारी सातच्या आत घरी’, अशा आशयाचे ट्विट शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के (naresh mhaske) यांनी केले आहे.

- Advertisement -

राज्यात शिंदे – फडणवीस सरकार येण्यापूर्वी ‘महाविकासआघाडीचे सरकार होते. तेव्हा का नाही दौरे केले. महाविकासआघाडीने शेतकऱ्यांसाठी काय केले?. असा प्रश्न सुद्धा उपस्थित करण्यात आला. अर्धा तासात दौरा कसा झाला? ही सगळी नाटकं आहेत. रात्री त्यांना बरीच कामं असतात,’ असा टोलासुद्धा नरेश म्हस्के यांनी लगावला.

हे ही वाचा – ‘पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात’; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे मोठे विधान

- Advertisement -

सत्तांतर झाले आणि त्यामुळे ”आदित्य ठाकरे (aditya thackeray) यांना धक्का बसला त्या धक्क्यामधून ते अजून बाहेर पडले नाहीत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः वारकरी आणि शेतकऱ्यांमध्ये जाऊन काम करत आहेत. आता सामान्य जनतेला जाऊन विचारा मुख्यमंत्री कोण आहेत. यापूर्वी हाच प्रश्न जनतेला विचारला तेव्हा अजित पवार , सुप्रिया सुळे आणि शरद पवार (sharad pawar) मुख्यमंत्री आहेत अशी उत्तरं जनतेतून येत होती. पण आता ती परिस्थिती राहिली नाही”. असा टोला सुद्धा नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

दरम्यान ”आदित्य ठाकरे यांनी आमच्यात कितीही भांडणं लावण्याचा प्रयत्न केला तरी आमच्यात भांडणं होणार नाहीत. मुख्यमंत्री (eknath shinde) आणि उपमुख्यमंत्री (devendra fadanvis)एकत्र येऊन काम करत आहेत आणि याचा परिणाम महाराष्ट्राचा जो विकास होत आहे त्यातून दिसत आहे. असंही शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के म्हणाले.

हे ही वाचा –  ‘पण अहंकार आडवा येतो’; उद्धव ठाकरेंचे नाव न घेता प्रवीण दरेकरांचा टोला

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -