घरमहाराष्ट्रकेंद्र-राज्यात भाजप सरकार, मग महाराष्ट्रातील एक इंजिन फेल का?, आदित्यचा शिंदे-फडणवीसांना सवाल

केंद्र-राज्यात भाजप सरकार, मग महाराष्ट्रातील एक इंजिन फेल का?, आदित्यचा शिंदे-फडणवीसांना सवाल

Subscribe

मुंबई : राज्यातील वेदांत फॉक्सकॉन प्रकल्पाप्रमाणे टाटा एअरबस प्रकल्पही गुजरातमध्ये गेल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापलेय. यात सत्ताधारी शिंदे – फडणवीस सरकारकडून हा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाण्यास मविआ सरकारला जबाबदार धरत आहे. मात्र मविआसह सर्व विरोधी पक्षांनी आता सरकारला घेरले आहे. यात पार्श्वभूमीवर आज युवासेने नेते आदित्य ठाकरेंनीही महाराष्ट्रातून एकामागोमाग एक प्रकल्प जाण्यासाठी शिंदे फडणवीस सरकार जबाबदार असल्याचे म्हणत निशाणा साधला आहे. केंद्रात-राज्यात भाजप सरकार, मग महाराष्ट्रातील एक इंजिन फेल का? असं सवाल आदित्य ठाकरेंनी केला आहे. केंद्रात भाजपचं सरकार आहे पण जेव्हा महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार होते तरी डबल इंजिन चालू होतं, मग हे गद्दार सरकार आल्यानंतर एक इंजिन फेल का गेलं? असा सवालही आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला आहे.  शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ( tata airbus maharashtra lost its fourth project after shinde fadanvis govt came to power shiv sena aaditya thackeray targeted)

राज्याचे मंत्री खोटं बोलतात का? 

यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या टीकेला उत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले की, मी आज सकाळी त्यांच विधान ऐकलं, काल ते यावर प्रतिक्रिया देण्यासाठी कुठेच नव्हते. जसे वेदांता फॉक्सकॉनबद्दल त्यांना काहीचं माहितचं नव्हत तसं एअर बस बद्दलही माहिती नव्हतं. मग एका वृत्तवाहिनीवर येऊन ते का बोलले, महाराष्ट्राशी आणि महाराष्ट्रातील तरुणांशी त्यांनी गद्दारी का केली? ते का खोटं बोलले? म्हणजे राज्याचे मंत्री खोटं बोलतात का? मग ते दिल्लीला जाऊन पंतप्रधानांशी बोलू असं त्यांनी हमखास का सांगितलं? या प्रकल्पाबाबत करार झाले हे सगळ्यांना माहिती नव्हत पण त्यांना माहित होत, मग एवढे महिने ते शांत का होते? असे अनेक सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केले आहेत.

- Advertisement -

खोके सरकारवर कोणत्याही उद्योजकाचा विश्वास नाही 

या खोके सरकारवर कोणत्याही उद्योजकाचा विश्वास बसलेला नाही, म्हणून राज्यात येणारा प्रत्येक उद्योग, गुंतवणूक ती आपल्या राज्यातून दुसऱ्या राज्यात जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री मंडळ, दहीहंडी, राजकीय भेटी, फोडाफोडी करत कोणत्याही दुसऱ्या राज्यात गेले नाही. गेल्या तीन महिन्यात मुख्यमंत्र्यांनी इतर राज्यात जाऊन प्रकल्पांची माहिती घेतली हे दाखवा. असा आरोपही आदित्य ठाकरेंनी केला आहे.

गद्दार सरकार आल्यानंतर एक इंजिन फेल का गेलं?

केंद्रात भाजप आणि राज्यातही भाजप सरकार असताना महाराष्ट्रातील एक इंजिन फेल का होत आहे? केंद्रात भाजपचं सरकार होत आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार होते तरी डबल इंजिन चालू होतं, मग हे गद्दार सरकार आल्यानंतर एक इंजिन फेल का गेलं? म्हणजे महाविकास आघाडी सरकारचं केंद्राबरोबर चांगलं चालू होतं. पण या खोके सरकारवर कोणाचाही विश्वास नाही, तुमचा, ना माझा, उद्योजकांचा…. निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी जो माणूस तयार नाही तो राज्यात गुंतवणूक काय आणणार? असा टोलाही आदित्य ठाकरेंनी शिंदे फडणवीस सरकारला लगावला आहे.

- Advertisement -

प्रसाद लाड यांच्यावर मी काहीच बोलणार नाही. मविआ काळात सगळ्यांनी मिळून साडे सहा लाख गुंतवणूक आणली. दावोसला महाराष्ट्राने ८० हजार गुंतवणूक आणली. हे सरकार आल्यावर का अपयश येतय. या खोके सरकारवर उद्योजक आणि इतरांचा विश्वास नाहीए. काल उद्योगमंत्र्यांनी कृषी खात्यावर tweet केलय, कृषी मंत्री एक्साईजवर करतात. ५० खोके हे सर्वश्रुत. राज्य सरकारवर विश्वास असेल तर उद्योजक राज्यात येतील.


गाऱ्यात फिरणं वेगळं अन् चॉकलेट खाणं…; सत्तारांचा आदित्य ठाकरेंना टोला

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -