घरठाणेडोंबिवली एमआयडीसी परिसरात पुन्हा प्रदूषण

डोंबिवली एमआयडीसी परिसरात पुन्हा प्रदूषण

Subscribe

निवडणुकीत विचारणार जाब

डोंबिवली । डोंबिवली एमआयडीसी निवासी विभाग आणि आसपासच्या परिसरात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात रासायनिक प्रदूषण होत आहे. गटारातून रासायनिक सांडपाणी सोडले जात असल्याने त्याच्या उग्र वासामुळे रहिवासी कमालीचे त्रस्त झाले आहेत. एमआयडीसीमधील प्रदुषणाबाबत वारंवार प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे पाठपुरावा करून देखील ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. त्यामुळे त्रस्त नागरिकांनी सह्यांची मोहीम सुरू केली असून 3 हजार नागरिकांच्या सह्यांचे निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, स्थानिक प्रतिनिधी, एमआयडीसी व प्रदूषण नियंत्रण मंडळाला देण्यात येणार आहे.त्यानंतर देखील प्रदूषणाबाबत उपयोजना झाली नाही तर येत्या लोकसभा निवडणुकीत लोकप्रतिनिधींना आणि मते मागण्यासाठी येणार्‍यांना स्थानिक नागरिक जाब विचारणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

डोंबिवली एमआयडीसी परिसरात अनेक ठिकाणी फुटलेल्या वाहिन्यामधून केमिकल मिश्रित सांडपाणी गटारातून , नाल्यातून वाहत असते. या रासायनिक सांडपाण्याच्या उग्र वासामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. एमआयडीसीमध्ये कधी वायू प्रदूषण तर कधी जल प्रदूषण होत असते. याबाबत स्थानिक नागरिकांनी यापूर्वी अनेकदा एमआयडीसी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रारी केल्या. मात्र आश्वासनांपलिकेड काहीच ठोस कारवाई होत नसल्याने एमआयडीसी निवासी विभाग आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. त्यातूनच या समस्येबाबत आता स्थानिक नागरिक एकवटले आहेत. ही समस्या निकाली काढण्यासाठी नागरिकांनी सह्यांची मोहीम सुरू केली. तब्बल तीन हजार सह्यांचे निवेदन स्थानिक नागरिकांकडून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पर्यावरण मंत्री, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि एमआयडीसी प्रशासनाला देण्यात येणार असल्याचे नागरिकांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -