घरठाणेआता खासगीप्रमाणे महापालिकेच्या शाळेचा गणवेश

आता खासगीप्रमाणे महापालिकेच्या शाळेचा गणवेश

Subscribe

प्रशासनाकडून गणवेशाबाबत चाचपणी सुरू

खासगी इंग्रजी शाळांच्या स्पर्धेत आता महापालिका ही उतरली आहे. इंग्रजी शाळा सुरू करून थांबले नाहीतर त्या शाळेत येणाऱ्या विद्यार्थी ही खासगी शाळेप्रमाणे गणवेशात यावा. यासाठी महापालिका प्रशासनाने गणवेश बदलण्याचा निर्णय घेतला असून गणेवशाच्या रंगाची चाचपणी सुरू झाली आहे. त्याचबरोबर मराठी माध्यमाच्या शाळांनाही बळकटीकरण करण्यावर देणे सुरू केले. जो गणवेशाचा बदलणार रंग हा प्राथमिक आणि माध्यमिक यांच्यासाठी एकच असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या मुळे महापालिकेच्या मराठी असो या इंग्रजी माध्यमात शकणार विद्यार्थी ही खासगी शाळांप्रमाणे गणवेशात दिसेल तर नवल वाटून घेऊ नये.

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून ६७ बालवाडी, ११७ प्राथमिक आणि २२ माध्यमिक शाळा ( मराठी आणि इंग्रजी) सुरू आहेत. त्यामध्ये सद्यस्थितीत एकूण ३५ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शिक्षणाच्या वाढत्या स्पर्धेमुळे आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे पालकांचा असलेला कळ यामुळे गेल्या काही वर्षांपासून महापालिका शाळेच्या पटसंख्येत घट होताना दिसत आहे. त्यामळे महापालिकेने यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये सीबीएसई शाळा सुरु करण्याचे प्रस्तावित केले आहे. तसेच इंग्रजी शाळा सुरु करण्याबरोबरच मराठी माध्यमातील शाळांचे बळकटीकरण करण्यावर पालिकेने भर दिला आहे. यामध्ये शाळा इमारतींची दुरुस्ती व रंगरंगोटी करणे, बालस्नेही वर्ग तयार करणे, स्मार्ट वर्ग खोली तयार करणे, वर्गखोली डिजीटल करणे अशी कामे करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे खासगी शाळांप्रमाणेच महापालिका शाळांचा गणवेश करण्याचा विचार सुरु केला आहे. प्राथमिक, माध्यमिक शाळांसाठी एकाच रंगाचा गणवेश ठेवण्याबाबत पालिकास्तरावर विचार सुरु आहे. तसेच गणवेश कोणत्या रंगाचा असावा आणि चांगल्या दर्जाचे कापड आहे का या सर्वाची पालिका चाचपणी करत आहेत, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली. तसेच गणवेश रंग जरी निश्चित झाला तरी पटसंख्या असलेल्या विद्यार्थ्यांना शाळा सुरू होईपर्यंत ते गणवेश देता येतील का याचाही विचारविनिमय सुरू झाला आहे. जर ते देणे शक्य झाल्यास ते यंदा नाहीतर पुढच्या वर्षी नव्या रंगाचा गणवेश दिला जाईल असेही सूत्रांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -