घरठाणेठाणे रेल्वे प्रवाशांच्या समस्या खासदारांनी मांडल्या रेल्वे प्रशासनासमोर

ठाणे रेल्वे प्रवाशांच्या समस्या खासदारांनी मांडल्या रेल्वे प्रशासनासमोर

Subscribe

ठाणे – वाशी हार्बर रेल्वे मार्गावर एसी लोकल वाढण्याबरोबर रेल्वे हद्दीतील फेरीवाल्यांना रोखण्यासाठी धोरण निश्चित करणे, कल्याण व मुंबई दिशेस सुरू असलेला पादचारी पूल लवकर मार्गी लावावा. लांब पल्ल्यांच्या गाड्यांना ज्या फलाटांवर थांबा आहे त्याठिकाणी सरकते जिने बसवणे याशिवाय वातानुकूलित शौचालय, फलाटवर महिलांसाठी स्वतंत्र शौचालय, दिव्यांगांसाठी शौचालयाची व्यवस्था उपलब्ध करून देणे, बनारस, जौनपूर, आझमगडकडे जाणारी एलटीटी बनारस एक्सप्रेस ट्रेन १२१६७/१२१६८ एलटीटी बनारस एक्सप्रेसला आगमन आणि प्रस्थाना दरम्यान ठाणे स्थानकावर थांबा आदी मागण्या ठाणे खासदार राजन विचारे यांनी बुधवारी मध्य रेल्वे अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत मांडल्या.
दरवर्षीप्रमाणे मध्य रेल्वे महाव्यवस्थापक व रेल्वेच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समवेत सर्व खासदारांच्या आयोजित होणाऱ्या बैठकीत ठाण्यातील रेल्वे प्रवाशांच्या भेडसवणाऱ्या समस्यांचा पाढा वाचून रेल्वेकडून प्रवाशांसाठी जास्तीत जास्त सुविधा मागून घेतल्या या बैठकीसाठी खासदार अरविंद सावंत, राजन विचारे, मनोज कोटक, हेमंत गोडसे व मध्य रेल्वे महाव्यवस्थापक नरेश लालवानी, एजीएम अलोक सिंग, मुख्य परिचालन प्रबंधक मुकुल जैन, मुख्य वाणिज्य प्रबंधक डी वाय नाईक, मुख्य सुरक्षा आयुक्त अजोय सदानी व सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
लोकवस्ती असल्याने या ठाणे रेल्वे स्थानकाचा विस्तार होऊ न शकल्याने दररोज ७ ते ८ लाख प्रवासी हे स्थानक पेलु शकत नसल्याने प्रवाशांना रेल्वे स्थानकातून बाहेर पडताना दमछाक करावी लागते. यासाठी ठाणे मुलुंड दरम्यान मंजूर झालेल्या नवीन रेल्वे स्थानकाचे काम लवकरात लवकर सुरू करावे. त्यावर मध्य रेल्वेने स्थानकाच्या कामांसाठी 184.21 कोटी रक्कम व जागेची मालकी रेल्वेला मिळण्यासाठी ठाणे महानगरपालिकेकडे पत्रव्यवहार करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली.
तसेच खासदार राजन विचारे यांनी गेल्या अनेक वर्षांच्या पाठपुराव्यानंतर रेल्वे लँड डेव्हलपमेंट या विभागाकडून ठाणे रेल्वे स्थानकाचा होणारा विकास कामांचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी रेल्वेने ठाणे रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाच्या संकल्पनेच्या आराखड्यात रूफ प्लाझा, निर्गमन/येणाऱ्या प्रवाशांना वेगळे करणे, वेटिंग हॉल, लिफ्ट आणि एस्केलेटरची तरतूद, बहुस्तरीय कार पार्किंग, मल्टीमॉडल ट्रान्सपोर्ट, कनेक्टिव्हिटी आणि इतर जागतिक दर्जाच्या सुविधांचा समावेश करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. तसेच आरएलडीए कडून आराखडा अंतिम करण्यात येत आहे. डिझाईनचे काम पूर्ण झाल्यावर याचे पुन्हा सादरीकरण करून आपल्या सूचनांचा समावेश त्यामध्ये करण्यात येईल असे सांगण्यात आले तसेच खासदार राजन विचारे यांनी रेल्वे प्रवाशांना या ठाणे रेल्वे स्थानकात सुरू होणाऱ्या विकास कामांचा त्रास होऊ नये यासाठी ठाणे मुलुंड दरम्यान नवीन रेल्वे स्थानकाच्या कामाला गती द्या असे सांगण्यात आले.
त्याचबरोबर कोपरी पूर्व येथे सुरू असलेल्या सॅटिस टू च्या कामांचा आढावा घेऊन सदर काम प्रगतीपथावर सुरू असून RLDA ने SATIS च्या रेखांकनामध्ये काही बदल प्रस्तावित केले आहेत. ज्यासाठी TMC आणि RLDA दोन्ही समन्वय करत आहेत. सध्याचा फूड प्लाझा आधीच बंद करून जागा हस्तांतरित करण्यात आली आहे. बुकिंग ऑफिस तात्पुरते पोर्टा केबिन येथे हलवले जाईल. त्याच बरोबर २ एस्केलेटर ३०/०५/२०२३ पर्यंत हलवले जातील. अशी माहिती त्यावेळी देण्यात आली.

दिघा रेल्वे स्थानक लवकर सुरू करा- खासदारांची रेल्वे प्रशासनाकडे मागणी
ठाणे:  MUTP-3 च्या ऐरोली कळवा एलिवेटेड या प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील दिघा रेल्वे स्थानकाचे काम पूर्ण झाले असून हा दिघा रेल्वे स्थानक प्रवाशांसाठी सुरू करा अशी मागणी खासदार राजन विचारे यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली.
दुसऱ्या टप्प्यातील रेल्वे मार्गीका व कळवा एलिवेटेड स्टेशन काम सुरू करण्यासाठी १०८० झोपड्यांचे पुनर्वसन एमएमआरडीए व आर अँड आर मार्फत झाल्यानंतर सुरू करण्यात येईल असे सांगण्यात आले. परंतु खासदार विचारे यांनी काम सुरू होईपर्यंत या मार्गिकेवर १ लाईनवरून माल डब्यांची गाडी येत असते त्या मार्गिकेचे मजबुती करून करून सकाळी व संध्याकाळी कल्याण – डोंबिवली वरून येणाऱ्या गाड्या थेट नवी मुंबईला सोडण्याची मागणी रेल्वे प्रशासनाकडे केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -