घरthaneमराठा आरक्षण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच देऊ शकतात

मराठा आरक्षण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच देऊ शकतात

Subscribe

आरक्षण न मिळाल्यास कल्याण जिल्हा प्रमुखपदाचा राजीनामा

मराठा समाजाच्या वतीने जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यात येत आहे. कल्याणमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर शुक्रवार पासून साखळी उपोषण सुरू करण्यात आले. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी मराठा आरक्षण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच देऊ शकतात, असे स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांवर मराठा समाजाचा विश्वास आहे त्यामुळे त्यांच्याकडून मराठ्यांना अपेक्षा आहेत,  असेही मोरे म्हणाले.
मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी पुन्हा एकदा मराठा समाज आक्रमक झालेला आहे. याच पार्श्वभूमीवर कल्याणमध्ये  मराठा समाजाच्या वतीने जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यात येत आहे. कल्याण मध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू करण्यात आले  आहे.यावेळी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अरविंद मोरे म्हणाले की, सरकारने जर लवकरात लवकर आरक्षण दिले नाही तर जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देईन, या साखळी उपोषात धनजय जोगदंड, विलास रंदवे, सुभाष गायकवाड, दर्शन देशमुख आदी सह मोठ्या संख्येने मराठा समाज बाधंव उपस्थितीत होते.

माझ्या बोलण्याचा विपर्यास केला
माझ्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आला आहे. या महाराष्ट्राराला 17 ते 18 मुख्यमंत्री मराठा समाजाचे मिळाले आहेत. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वेगळे आहेत. दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेऊन घोषित केलं की मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. त्यामुळे मराठ्यांना आरक्षण फक्त एकनाथ शिंदेच देऊ शकतात. असा आमचा विश्वास आहे. त्यामुळे जरांगे पाटील उपोषणाला बसले असताना त्यांनीही एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास व्यक्त केलेला आहे. त्यामुळे सरसकट टीकणारे आरक्षण आणि कुणबी दाखले हे एकनाथ शिंदेच करू शकतात. जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केल्यावर कल्याणमध्ये मराठ्यांनी साखळी उपोषण सुरू केले आहे. माझ्या म्हणण्याचा विपर्यास करण्यात आला, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मराठा आणि ते एकनाथ शिंदेच असले पाहिजेत, असा माझ्या बोलण्याचा अर्थ होता. त्यामुळे मराठा मुख्यमंत्र्यांची महाराष्ट्राला गरज आहे. एकनाथ शिंदे आरक्षण देतील अशी अपेक्षा आहे, मात्र जर आरक्षण मिळाले नाही तर मी कल्याण जिल्हा प्रमुखपदाचा राजीनामा देईन. ज्या ठिकाणी मराठा समुदाय जास्त आहे त्या ठिकाणी आरक्षणासाठी मराठ्यांनी नेत्यांना, मंत्र्यांना केलेली गावबंदी बरोबरच आहे.  -अरविंद मोरे, कल्याण जिल्हा अध्यक्ष, शिवसेना शिंदे गट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -