घरठाणेशिवसेनेतर्फे एसएससी सराव परीक्षेचे आयोजन

शिवसेनेतर्फे एसएससी सराव परीक्षेचे आयोजन

Subscribe

दहावी अर्थात एस.एस.सी बोर्डाच्या परीक्षेबाबत विद्यार्थ्यांच्या मनात असलेली भिती जावून त्यांचा आत्मविश्वास वाढावा आणि पालकांची चिंता दूर व्हावी यासाठी एस.एस.सी बोर्डाच्या पद्धतीने सराव परीक्षा ठाण्यात शिवसेनेच्यावतीने घेतली जाते. धर्मवीर आनंद दिघेसाहेबांनी या सराव परीक्षा सुरू केल्या त्या आजतागायत एकही वर्षे खंड न पडता विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, महाराष्ट्र प्रदेश समन्वयक आणि ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांच्या संयोजनाखाली सुरू आहे. यंदाच्या या परीक्षेचे 33 वे वर्ष आहे. 14 जानेवारी 2024, 21 जानेवारी 2024 आणि 28 जानेवारी 2024 या दिवशी या सराव परीक्षा दोन सत्रात घेण्यात येणार आहे.

ठाण्यात कळवा, मुंब्रा, कोपरी ठाणे पूर्व, किसननगर, पडवळनगर, सावरकरनगर, लोकमान्यनगर, वर्तकनगर, काजूवाडी, मानपाडा, दिवा, ज्ञानेश्वरनगर, मीराभाईंदर, जव्हार, वाडा आणि ठाणे शहरात चार अशा 30 परीक्षा केंद्रावार या परीक्षेत होणार आहेत. तरी या परीक्षेला बसू इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांनी उपरोक्त नमूद केंद्रावरील शिवसेना शाखांमध्ये संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी 9819875567 आणि 7977515661 या क्रमांकावर किंवा शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, न्यू इंग्लिश स्कूलजवळ, डॉ. मुस रोड, तलावपाळी, ठाणे येथे संपर्क साधावा. तसेच या ठिकाणी प्रवेश अर्ज दररोज सायंकाळी 6 ते रात्री 8 या वेळेत स्वीकारण्यात येतील, अशी माहिती देण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -