घरठाणेगांजा, हॅश ऑईल हे अंमली पदार्थ बाळगणारे तिघे अटकेत

गांजा, हॅश ऑईल हे अंमली पदार्थ बाळगणारे तिघे अटकेत

Subscribe

55 लाखाचे अंमली पदार्थ जप्त, वासिंद पोलिसांची कारवाई

नशेसाठी वापरण्यात येणारा गांजा आणि हॅश ऑईल हे अंमली पदार्थ बाळगल्या प्रकरणी वासिंद पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. सुमारे 46 किलो गांजा व 412 ग्रॅम हॅश ऑईल असे तब्बल 55 लाखाचे अंमली पदार्थ बाळगणार्‍या तिघांना वासिंद पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून अंमली पदार्थ जप्त केले आहेत. मुंबई-नाशिक महामार्गावरील खातीवली गावाच्या हद्यीतील शुभगृह या सोसायटी मध्ये ही धडक कारवाई करण्यात आली. थर्टीफर्स्टच्या पार्श्वभूमीवर केलेल्या या धडक कारवाईमुळे अंमली पदार्थांचा साठा आणि तस्करी करणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.

मुंबई-नाशिक महामार्गावरील वासिंद लगत असलेल्या खातीवली गावाच्या हद्यीतील शुभगृह सेक्टर ए या हौसिंग सोसायटी मध्ये अंमली पदार्थ असल्याची खबर वासिंद पोलिसांना मिळाली होती. शहापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी मिलींद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वासिंद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समशेर तडवी, सहाय्यक पोलीस निरिक्षक महेश बोलके तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरिक्षक भास्कर जाधव, महेश कदम, संतोष सुर्वे, प्रकाश साहील, सतिष कोळी, स्वप्नील बोडके यांच्या पथकासह सापळा रचून धाड टाकली. यामध्ये सेक्टर ए मध्ये राहणारा रुपेश रमेश जाधव (33) व त्याचे साथीदार संदेश अशोक खरात (23), समशेर गुलमहंमद खान (24) यांच्या कडून 11 लाख 36 हजार 325 रुपये किंमतीचा 46 किलो 653 ग्रॅम वजनाचा गांजा आणि 41 लाख 20 हजार रुपये किंमतीचे 412 ग्रॅम हॅशऑईल नावाचे अंमली पदार्थ तसेच हे अंमली पदार्थ पॅकींग करण्याचे साहीत्य जप्त करण्यात आले आहे.
तिघांविरुद्ध वासिंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक दीपाली धाटे, शहापुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी विभाग मिलींद शिंदे व पथकाने थर्टीफर्स्ट च्या पार्श्वभूमीवर केलेल्या या धडक कारवाईमुळे अंमली पदार्थांचा साठा व तस्करी करणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -