घरठाणेठाणे जिल्हा हा युतीचाच बालेकिल्ला- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे जिल्हा हा युतीचाच बालेकिल्ला- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Subscribe

कल्याण । ठाणे जिल्हा हा भाजपा शिवसेना युतीचा बालेकिल्ला असून ही तटबंदी अभेद्य राखण्याचे काम युतीमधील सर्वांनी मिळून मिसळून करून मला राज्यातील इतर कामे करण्यासाठी मोकळीक द्यावी, असे परखड विधान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण पूर्व येथे आयोजित केलेला सभेत केले. कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रेरणेने धर्मवीर आनंद दिघे जनकल्याण कार्यक्रम कल्याण पूर्वेतील चक्की नाका येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील, कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे व अन्य शिवसेना भाजपाचे कार्यकर्ते व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की दिल्लीमधील आग्रा येथील लाल किल्ल्यात येत्या 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होत असल्याचे सांगितले. राज्यात सात महिन्यापासून मतदारांनी निवडून दिलेल्या मतदारांचे सरकार स्थापन करण्यात आले असल्याचे सांगत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की आमचा यामध्ये काहीच स्वार्थ नव्हता, यामुळे सरकार स्थापन झाल्यापासून आम्ही लोकपयोगी कार्यक्रमाचा राज्यभर सपाटा लावला आहे. आम्ही राज्यातील सगळ्यांनाच न्याय देणार आहोत असे सांगत निर्णय घेण्यासाठी ही धाडस लागते, असा टोला देखील त्यांनी यावेळी विरोधकांना लगावला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -