घरठाणेनिवडणूक काळात अधिकार्‍यांना मुख्यालयी वास्तव्य बंधनकारक

निवडणूक काळात अधिकार्‍यांना मुख्यालयी वास्तव्य बंधनकारक

Subscribe

मुरबाड । लोकसभा निवडणुक २०२४ चा कार्यक्रम सुरू असून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होण्यासाठी जिल्हाधिकारी ठाणे यांनी सर्व विभाग प्रमुखांना मुख्यालयी वास्तव्य करण्याचे आदेश पारित केले आहेत. तालुक्यातील प्रशासनाचा केंद्र बिंदू असलेले तहसीलदार, गटविकास अधिकारी, उप अभियंता सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे, मंडळ अधिकारी, तलाठी, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक यांच्यासह अनेक अधिकारी मुरबाड तालुक्याबाहेर वास्तव्य करीत असल्याने या निवडणूक काळात तरी ते मुरबाड तालुक्यात वास्तव्य करून निवडणूक कामात पारदर्शकता ठेवलीय काय अशी चर्चा मतदारांमध्ये वर्तवली जात आहे. त्याचेवर कोणती कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सध्या उन्हाची तीव्रता वाढत असल्याने अनेक ठिकाणी आगीच्या घटना घडत आहेत.अशा वेळी कोणत्याही प्रकारची जीवीत हानी होऊ नये त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने घटनास्थळी पोहोचविण्याची जबाबदारी ही खाते प्रमुखांची असल्याने त्यांना या परिस्थितीवर मात करण्यासाठी मुख्यालयी वास्तव्य करणे सक्तीचे असताना ते तालुक्याबाहेर आपले वास्तव्य करीत आहेत. शिवाय लोकसभा निवडणुकांची देखील सर्वत्र लगबग सुरु असल्याने हा निवडणूक कार्यक्रम अत्यंत पारदर्शकपणे राबविण्यात यावा यासाठी जिल्हाधिकारी यांनी सर्व विभाग प्रमुखांना मुख्यालयी वास्तव्य करण्याचे आदेश दिले असताना तालुक्यातील तहसीलदार, नायब तहसीलदार,गटविकास अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता, राष्ट्रीय महामार्ग उप अभियंता इतर विभागाचे उप अभियंता यांना सुसज्ज आणि सर्व सुविधा युक्त शासकीय निवासस्थाने उपलब्ध आहेत. असे असताना ते मुख्यालयी वास्तव्य न करता मुंबई ठाणे शहरात वास्तव्य करीत आहेत. प्रवासासाठी आपल्या शासकीय वाहनांचा वापर करीत असून लागणार्‍या इंधनाचा भार मात्र शासकीय तिजोरीवर टाकत आहेत. त्यामुळे निवडणूक कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी तसेच आदर्श आचार संहितेचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी हे अधिकारी आपला किती प्रमाणात सहभाग दाखवतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

- Advertisement -

जिल्हाधिकारी यांनी पारित केलेल्या आदेशाचे सर्व अधिकारी, ग्रामसेवक, कर्मचारी यांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सुचना दिल्या आहेत.
-श्वेता पालवे, गटविकास अधिकारी.पंचायत समिती मुरबाड

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -