घरठाणेरखडलेला घर प्रकल्प मार्गी लागणार- मुख्यमंत्री

रखडलेला घर प्रकल्प मार्गी लागणार- मुख्यमंत्री

Subscribe

बीएसयुपी अंतर्गत बारा वर्षापासून बांधण्यात आलेली घरे प्रकल्पग्रस्तांना देण्याकरताची कार्यवाही रखडली होती. यामध्ये दोन्ही खासदार आणि आमदारांनी प्रयत्न केले होते, मात्र यामध्ये इच्छाशक्ती महत्त्वाची असून काळ व योग जुळून आल्याने रखडलेला प्रकल्प मार्गी लागल्याचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने आयोजित केलेल्या विविध उपक्रमाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बुधवारी कल्याण पश्चिम येथे करण्यात आला. यावेळी प्रबोधनकार ठाकरे सरोवर सेनाळे तलाव सुशोभीकरण, बीएसयुपी अंतर्गत बांधलेल्या सदनिकांचे प्रकल्प बाधितांना वाटप, मल शुद्धीकरण केंद्र या प्रकल्पांचे यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी लोकार्पण केले.

राज्य सरकार आता नागरिकांच्या हिताचा विचार करीत असल्याने निर्णय देखील त्या स्वरूपाचा केला जात असल्याचे सांगत मुख्यमंत्री म्हणाले की राज्याचा यंदाचा अर्थसंकल्प देखील सर्वसामान्य नागरिकांचा हिताचाच असेल. पुढे म्हणाले की राज्यातील अरिष्ट दूर झाले पाहिजे. तसेच सर्वसामान्यांना व शेतकऱ्यांना चांगले दिवस आले पाहिजेत. खड्डे मुक्त कल्याण शहर तसेच नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविण्यास आम्ही कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. नागरिकांच्या आरोग्यासाठी कल्याण पूर्व पश्चिमेत दोन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची निर्मिती करण्याचे आदेश कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर भाऊसाहेब दांगडे यांना यावेळी दिले. तसेच मेट्रोच्या कामालाही आपण गती देणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली.

- Advertisement -

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने आयोजित केलेल्या यशवंतराव चव्हाण मैदान यावेळी तुडुंब भरले होते. मैदानाबाहेर देखील मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे दिसत होते. या लोकार्पण सोहळ्यात प्रामुख्याने केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, आमदार विश्वनाथ भोईर, विधान परिषद सदस्य ज्ञानेश्वर म्हात्रे, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर भाऊसाहेब दांगडे, ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, कल्याण डोंबिवली महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रल्हाद रोडे, सिटी इंजिनियर अर्जुन अहिरे तसेच बाळासाहेबांची शिवसेना पदाधिकारी व भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने व्यासपीठावर उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -