घरठाणेसहाय्यक आयुक्त महेश आहेर हल्ल्याप्रकरणी आव्हाडांसह सातजणांवर गुन्हा दाखल

सहाय्यक आयुक्त महेश आहेर हल्ल्याप्रकरणी आव्हाडांसह सातजणांवर गुन्हा दाखल

Subscribe

ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याच्या धमकीची एक कथित ऑडिओ क्लिप देखील व्हायरल झाली आहे. यावरून ठाणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्यावर बुधवारी सायंकाळी प्राणघातक हल्ला करण्यात आला. याप्रकरणी नौपाडा पोलिसांनी जितेंद्र आव्हाड यांच्यासह सातजणांवर गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यासंदर्भातील एक कथित ऑडिओ क्लिप देखील व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये बोलणारी व्यक्ती जितेंद्र आव्हाड, त्यांची मुलगी आणि जावयाला मारण्याचा कट आखत असल्याचे स्वतः जितेंद्र आव्हाड यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.

 

- Advertisement -

डाॅ. जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कुटुंबाला संपवण्यासाठी तिहार जेलमध्ये असलेला गँगस्टर बाबाजी उर्फ सुभाषसिंग ठाकूर याच्या मदतीने शूटर तैनात केले असल्याचे या संभाषणात एका व्यक्तीने म्हटले आहे. सदर क्लिपमध्ये बोलणाऱ्या व्यक्तिचे नाव महेश आहे. ती व्यक्ती ठाणे महापालिकेचे प्रभारी सहाय्यक आयुक्त महेश आहेर असल्याचा दावा केला जात आहे.

याच दाव्यावरून राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी प्रभारी सहायक आयुक्त महेश आहेर यांना त्यांच्या अंगरक्षकसोबत असताना महापालिका मुख्यालयाच्या मागील गेट चारच्या बाहेर बेदम मारहाण केली. हा प्रकार बुधवारी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास घडला. या मारहाणीत महेश आहेर यांच्या डोळ्याला दुखापत झाली आहे. आहेर यांना पोलीस संरक्षण आहे. जेव्हा हा हल्ला झाला तेव्हा त्यांचे अंगरक्षक त्यांच्यासोबत होते. महेश आहेर यांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ठाण्याचे प्रभारी सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी नौपाडा पोलिसांनी यासंदर्भात रात्री उशिरा गुन्हा दाखल केला. जितेंद्र आव्हाड यांच्यासह अभिजीत पवार, हेमंत वाणी, विक्रम खामकर आणि अन्य तिघे अशा सातजणांविरुद्ध भादंवि कलम 353, 307, 332, 506(2), 143, 148, 149, 120 (बी) यासह शस्त्रास्त्रे कायद्याच्या 3/25, 4/25 अन्वये एफआयआर (क्रमांक 60/2023) नोंदवण्यात आला आहे. अभिजीत पवार हे जितेंद्र आव्हाड यांचे खासगी सचिव आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -