घरठाणेजमिनीच्या वादातून मामाची हत्या

जमिनीच्या वादातून मामाची हत्या

Subscribe

कल्याण । जमिनीच्या हिस्सातील वादातून आपसातील जवळच्या नातेवाईकांनी खडवली जवळील रुंदे आंबिवलीतील गावात आपल्याच साठ वर्षीय नातेवाईकांची डोक्यात लोखंडी रॉड टाकून हत्या केल्याची घटना घडली आहे. एका खाजगी रुग्णालय जखमी शेतकर्‍याचा मृत्यू झाल्याने याप्रकरणी तीन जणांना ताब्यात घेतले असून चार जणांचा पोलीस शोध घेत आहेत. जमिनीच्या वादातून घटना घडल्याने खडवली परिसरात मात्र खळबळ उडाली आहे.

खडवली नजीक रुंदी आंबिवली येथे राहत असणारे चांगदेव कचरू बनकरे या शेतकर्‍याचा मारहाणीत उपचार सुरू असताना तब्बल २१ दिवसानंतर मृत्यू ओढवला असल्याची माहिती टिटवाळा पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत चांगदेव यांची बहीण उठणे गावात राहत असून त्यांनी यापूर्वीच आपल्या बहिणीला दोन एकर जमीन दिली होती. मात्र शेतीच्या जमिनीत आणखी हिस्सा पाहिजे असल्याने या नातेवाईकांमध्ये वादावादी सुरू होती. पाच एप्रिल रोजी रुंदे आंबिवलीतील गावातील शेतावर बनकरे परिवार शेतीवर काम करीत असतानाच उठणे गावातील नातेवाईकांनी जमिनीचा वाद उकरून काढण्यास सुरुवात केली. याबाबत वाद टोकाला गेल्याने रागाच्या भरात टोके परिवाराने डोक्यात लोखंडी रॉड टाकून लाकडी बांबूने जबर मारहाण करीत चांगदेव बनकरे यांना जबर जखमी केले होते.

- Advertisement -

जखमी अवस्थेत उपचारार्थ बनकरे यांना कल्याण मधील एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र 21 दिवसानंतर जबर जखमी झालेले चांगदेव बनकरे यांचा गुरुवारी रुग्णालयात मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याबाबत टिटवाळा पोलिसांनी एकूण तीन जणांना ताब्यात घेतले असून इतर आणखी आरोपी मात्र अद्यापही फरार आहेत. पोलिसांनी याप्रकरणी मृताची बहीण, तिचे पती मुले आणि अन्य जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून टिटवाळा पोलीस स्टेशनचे सीनियर पोलीस इन्स्पेक्टर जितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सब इन्स्पेक्टर संभाजी माने या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -