घरठाणेठामपा आरोग्य विभाग भरणार ७२ कंत्राटी परिचारिका

ठामपा आरोग्य विभाग भरणार ७२ कंत्राटी परिचारिका

Subscribe

ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात गेल्या आठवड्यात झालेल्या १८ जणांचा मृत्यूनंतर तेथील भोंगळ कारभाराबरोबर मनुष्यबळ कमी असल्याची बाबही समोर आली. त्यानंतर रुग्णालयावर टीकेचा भिडमारा सुरू झाल्यावर ठामपा आरोग्य विभागाने तातडीने ७२ कंत्राटी पध्दतीवर परिचारिका भरण्याचा निर्णय घेतला. तसेच येत्या २९ ऑगस्ट रोजी त्या ७२ जागेसाठी थेट मुलाखत घेतली जाणार आहे. ही भरती, येत्या काही महिन्यात हे रुग्णालयात वाढीव बेड्स तयार झाल्यावर केली जाणार होती. मात्र ती या मृत्यूच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर तातडीने केली जाणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली.

त्यातही कोवीड कालावधीत महापालिकेकडे परिचारीका म्हणून सेवा दिलेल्या उमेदवारांस प्राधान्य दिले जाईल असेही पालिकेने स्पष्ट केले आहे. कळवा रुग्णालयात मागील आठवड्यात एकाच दिवशी १८ रुग्णांचा मृत्यु झाला होता. त्यानंतर त्यात आणखी चार रुग्णांची भर पडली होती. या दुर्देवी घटनेनंतर या ठिकाणी असलेल्या अनेक असुविधांची चर्चा झाली होती. तसेच येथील अपुऱ्या मनुष्यबळावर देखील अनेकांनी आक्षेप घेतला होता. कळवा रुग्णालयात १२५ शिकाऊ आणि १५० च्या आसपास तज्ञ डॉक्टर आहेत. मधल्या काळात या रुग्णालयात ८८० पदे भरण्याबाबत राज्य शासनाने मंजुरी दिली होती. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी महापालिकेच्या माध्यमातून डॉक्टर व इतर महत्वाची पदे भरण्याची तयारी केली होती. परंतु कमी पगार असल्याने अनेकांनी त्याकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले. दरम्यान मागील आठवड्यात झालेल्या दुर्देवी घटनेनंतर आता पुन्हा एकदा आरोग्य विभागाने रिक्त पदे भरण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. सध्या कळवा रुग्णालयात २१० परिचारिका पदे मंजुर आहेत. त्यातील १८० पदे भरली गेली आहेत. त्यानुसार केवळ ३० पदे रिक्त असल्याचे सांगतिले जात आहे. परंतु आता आरोग्य विभागाने ७२ पदे कंत्राटी स्वरुपात भरण्याची तयारी सुरु केली आहे. येत्या २९ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजता थेट मुलाखतींच्या माध्यमातून ही पदे भरण्यात येणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -