घरठाणेभिवंडीत सकल मराठा साखळी उपोषणाची सांगता

भिवंडीत सकल मराठा साखळी उपोषणाची सांगता

Subscribe

युवक आंदोलकांनी एसटी बसच्या फोटोला फासले काळे

शासनाकडे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषण आंदोलनास महाराष्ट्रातून पाठिंबा मिळत असताना त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भिवंडी शहरात सकल मराठा समाजातर्फे भिवंडीतील उपविभागीय कार्यालयासमोर मंगळवारी सुरू केलेले साखळी उपोषण बुधवारी दुसर्‍या दिवशीही सुरू होते. दुपारी उपविभागीय अधिकारी कार्यालयात नायब तहसीलदार चंद्रकांत राजपूत यांच्याकडे आपल्या मागणीचे निवेदन सकल मराठा समाजाचे सुभाष माने, साईनाथ पवार ,अशोककुमार फडतरे,अरुण राऊत, प्रवीण पाटील,भूषण रोकडे, इंद्रजित घाडगे, वनिता शिंदे यांनी सुपूर्द करून आपल्या आंदोलनाची सांगता केली.

भिवंडी शहरात सकल मराठा समाजा तर्फे भिवंडीतील उपविभागीय कार्यालयासमोर शांततापूर्ण वातावरणात दोन दिवस साखळी उपोषण सुरू असतानाच दुपारी काही उत्साही मराठा युवक कार्यकर्त्यांनी आपला मोर्चा जवळच असलेल्या बस स्थानकाकडे वळवला. त्या ठिकाणी रस्त्यावर येणार्‍या एस टी महामंडळाच्या बस गाड्यांवरील शासकीय जाहिरातीवर लावलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोवर काळे फासून आपला संताप व्यक्त केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -