घरठाणेभिवंडीतील मानकोली अंजुरफाटा चिंचोटी रस्त्याची दुरावस्था

भिवंडीतील मानकोली अंजुरफाटा चिंचोटी रस्त्याची दुरावस्था

Subscribe

राष्ट्रवादीच्या संतप्त कार्यकर्त्यांनी मालोडी टोलनाका फोडला

भिवंडी शहरालगत मुंबई-नाशिक महामार्गाला जोडलेल्या मानकोली-अंजुरफाटा- चिंचोटी या महामार्गाच्या रस्त्याची सध्या प्रचंड दुरावस्था झाली आहे. या रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले असून प्रवाशांसह नागरिकांना आपला जीव मुठीत धरून या मार्गावरून प्रवास करावा लागत आहे. वारंवार निवेदने व आंदोलने करूनही या नादुरुस्त महामार्गाकडे रस्ते विकास महामंडळ,शासकीय यंत्रणा तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि टोल कंपनी दुर्लक्ष करीत असल्याने संतप्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी या मार्गावरील मालोडी येथील टोलनाका फोडला आहे.

माणकोली-अंजुरफाटा-चिंचोटी या महामार्गावरून मुंबई,नवीमुंबई -अहमदाबाद अशी अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असून या अवजड वाहनांकडून टोल कंपनी मोठ्या प्रमाणात टोल वसूल करत आहे. मात्र चिंचोटी पासून मानकोली पर्यंतच्या 26 किलोमीटर रस्त्यावर अक्षरशः खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे तसेच धुळ व खडी रस्त्यावर पसरल्याने येथे दररोज अपघात होत आहेत. तसेच अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे या मार्गावर असलेल्या गावातील लोकांमध्ये अपघाताची भीती पसरली आहे.

- Advertisement -

या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष महेंद्र पाटील यांनी वेळोवेळी आंदोलने केली आहेत. तसेच काही महिन्यांपूर्वी टोल नाक्यासमोर उपोषण आंदोलन देखील केले होते. मात्र या आंदोलनांचा व निवेदनांचा काहीही परिणाम होत नसल्याने अखेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष महेंद्र पाटील व त्यांचे सहकारी प्रशांत म्हात्रे यांनी बुधवारी दुपारी मालोडी टोलनाका फोडून सार्वजनिक बांधकाम विभागाचा व टोल वसूल करणार्‍या कंपनीचा निषेध केला आहे. टोल नाका फोडण्यापूर्वी आंदोलकांनी व्हिडिओ बनवून या रस्त्याच्या दुरावस्थेबाबत आपल्या मागण्यांची दखल शासन घेत नसल्याने अखेर कायदा हातात घेऊन टोल नाका फोडत असल्याचे महेंद्र पाटील व प्रशांत म्हात्रे यांनी सांगून टोल नाका फोडला आहे, सध्या हा व्हिडिओ देखील समज माध्यमांवर प्रचंड व्हायरल होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -