घरठाणेडोंबिवली शहरात तीन दिवसांत बारा दुकाने फोडली

डोंबिवली शहरात तीन दिवसांत बारा दुकाने फोडली

Subscribe

केमिस्ट असोसिएशनचे पोलिसांना निवेदन

डोंबिवली । डोंबिवली शहरात गेल्या तीन दिवसात डझनभर दुकाने चोरट्यांनी फोडून चोरी केल्याची घटना उघडकीस आल्याने व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.विशेष म्हणजे घरफोडी झालेली सर्वाधिक 9 दुकाने मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहेत.

सध्या डोंबिवलीत चोर्‍या घरफोड्या यांचे प्रमाण वाढले असून चोरट्यांनी लोढा, संगीता वाडी, नंदिवली रोड या परिसरातील जवळपास सात दुकाने दुकानाची शटर तोडून रोकड आणि मुद्देमाल चोरून नेला. विशेष म्हणजे मानपाडा पोलीस चौकी समोर असलेले एस एस मेडिकल दुकान फोडले. लोढा मधील निळजे मेडिकल, जनेरिकार्ट, गेटवेल मेडिकल तर संगीता वाडी सिद्धी मेडिकल, स्वामी मेडिकल तर नंदिवली रोड ला विजया लक्षमी मेडिकल हे दुकाने फोडले आहे. सात मेडिकल व अन्य इतर दुकाने फोडण्यात आली आहेत.

- Advertisement -

डोंबिवली मेडिकल असोसिशनने सोमवारी मानपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेखर बागडे यांना भेटून निवेदन देण्यात आले. तसेच विशेष पथक नेमून चोरट्यांना अटक करावी तसेच मेडिकल दुकानांमध्ये व्हिजिट बुक ठेवावे अशी मागणी संघटनेने केली आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष दिलीप देशमुख, निलेश वाणी, दुधनाथ यादव यासह अन्य केमिस्ट व पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -