घरताज्या घडामोडीसिद्धिविनायक मंदिर बुधवारपासून पाच दिवस राहणार बंद, नेमकं काय आहे कारण?

सिद्धिविनायक मंदिर बुधवारपासून पाच दिवस राहणार बंद, नेमकं काय आहे कारण?

Subscribe

मुंबईतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले सिद्धिविनायक गणपती मंदिर बुधवारपासून पुढील पाच दिवसांसाठी बंद राहणार आहे. या सिद्धिविनायक मंदिरात लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. परंतु येत्या १४ डिसेंबर ते १८ डिसेंबर या पाच दिवसांसाठी सिद्धिविनायक मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद राहणार आहे. श्रींच्या प्रतिमेचे दर्शन भाविकांना १९ डिसेंबरला दुपारपासून घेता येणार आहे.

श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे भाविकांना आवाहन करत बुधवार दिनांक १४ डिसेंबरपासून ते रविवारी दिनांक १८ डिसेंबर २०२२च्या कालावधीमध्ये श्रींच्या मूर्तीला सिंदूर लेपन करण्यात येणार असल्याची माहिती दिली. त्यामुळे त्या कालावधीमध्ये भाविकांना प्रत्यक्ष श्रींच्या मूर्तींचे दर्शन बंद असेल, याऐवजी श्रींच्या प्रतिमेचे दर्शन घेता येईल असे, श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे.

- Advertisement -

सिद्धिविनायक मंदिरालाही एक प्राचीन इतिहास आहे. दादर येथील प्रभादेवी भागात असलेले हे भव्य मंदिर सर्वांचेच मोठे आणि महत्त्वाचे श्रद्धास्थान आहे. मंगळवार हा गणपतीचा वार मानला जातो. या दिवशी विशेष करून भाविक सिद्धिविनायकाच्या चरणी लीन होण्यासाठी आवर्जुन येतात. दर महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला विशेष धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.


हेही वाचा : वादावर मी पडदा टाकत आहे, सर्वांनी तो थांबवावा, चंद्रकात पाटलांचे आवाहन

- Advertisement -

 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -