घरठाणेशहापुरातील शेतकर्‍यांना अवकाळी पावसाचा फटका

शहापुरातील शेतकर्‍यांना अवकाळी पावसाचा फटका

Subscribe

घरे,आंबा बागायतदार, रब्बीचे नुकसान

शहापूर । रात्री साडेसातच्या दरम्यान अचानक आलेल्या वादळी वार्‍यासह अवकाळीच्या पावसाने शेतकर्‍यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. किन्हवली, शेणवा, मानेखिंड आणि डोळखांब परिसरात अनेक घरांची छप्परे उडाली असून आंबा बागायतदार, काकडी, भेंडी आदी रब्बी पिके, वीटभट्टीचे अतोनात नुकसान झाले आहे. विजेच्या तारा तुटल्याने काही ठिकाणी वीजपुरवठा खंडीत झाला आहे.

15 एप्रिल रोजी दिवसभर कमाल तापमान ४२ डिग्री सेल्सिअस होते. त्यानंतर सायंकाळी 7 च्या सुमारास अचानक वादळी वार्‍यासह पाऊस सुरू झाला. या पावसाने शेणवे,किन्हवली, डोळखांब, टाकीपठार आदी परीसरात धुमाकूळ घातला. पावसामुळे गावांतील अनेक आदिवासी, शेतमजूर, शेतकर्‍यांच्या घरांची, गोठ्यांची छपरे उडाली असून काही घरे कोसळून अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. घरातील कपडे, धान्य,गृहपयोगी वस्तूंची मोठ्या प्रमाणत नासधूस झाली आहे. गुरे, ढोरे जखमी झाले असून मोठ्या प्रमाणात वित्त हानी झाली आहे. अनेक ठिकाणी विजवाहक तारा तुटून रस्त्यांवर पडल्या होत्या, त्यामुळे अनेक गावांना रात्र अंधारात काढावी लागली. अवकाळीमुळे काकडी, भेंडी, घोसाळे, कारले, घेवडा आदी रब्बी पिके व आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. कच्च्या आंब्यांचे नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे करून बाधितांना त्वरीत आर्थिक मदत मिळावी अशी मागणी शेतकर्‍यांकडून होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -