घरव्हिडिओयुती करायचीय तर नागपूरला जायची काय गरज

युती करायचीय तर नागपूरला जायची काय गरज

Related Story

- Advertisement -

कोण कुठे दसरा मेळावा घेणार यावरून राज्यात राजकारण सुरू आहे. शिवाजी पार्कवर मागील ५६ वर्षं शिवसेनेचा दसरा मेळावा होत आहे आणि आताही तिथेच झाला पाहिजे यासाठी त्यांना ते मैदान मिळायला पाहिजे, असं माजी मंत्री छगन भुजबळ म्हणाले. निवडणुका झाल्यानंतर कळेल की जनता कुणासोबत आहे. चनद्रकांत बावनकुळे आणि राज ठाकरे यांची आज नागपूरमध्ये भेट झाली यावरून भाजपा आणि मनसे युती होणार का, असं विचारण्यात आल्यावर भुजबळ म्हणाले, राज ठाकरेंना भेटायला सगळेच राजकारणी येतात. जर त्यांना युतीच करायची असेल तर नागपूरला जायची काय गरज? ती इथेही होऊ शकते असा टोला भुजबळांनी लगावला. त्याचबरोबर ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक नंबरवर आलेला आहे, याचा आम्हाला खूप आनंद आहे, असंही भुजबळ म्हणाले.

Politics is going on in the state over who will hold the Dussehra gathering and where. Shiv Sena’s Dussehra gathering has been held at Shivaji Park for the past 56 years and they should get that ground for it to be held there as well. Said former minister Chhagan Bhujbal. After the election, we will know who the people are with. Bhujbal said when asked whether there will be an alliance between BJP and MNS because of Chandrakant Bawankule and Raj Thackeray’s meeting in Nagpur today. All politicians come to fill Raj Thackeray. Bhujbal retorted saying that if they want to make an alliance, why go to Nagpur, it can be done here as well. At the same time, we are very happy that the Nationalist Congress Party has come first in the Gram Panchayat elections. Bhaujbal also said that.

- Advertisement -