घरव्हिडिओदसरा मेळावा कुठे होणार हे निश्चित झालंय; शेवटी जनता ठरवेल कोण कुणासोबत...

दसरा मेळावा कुठे होणार हे निश्चित झालंय; शेवटी जनता ठरवेल कोण कुणासोबत आहे

Related Story

- Advertisement -

वेदांता प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला त्यावरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला. अशातच राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा यावर खंत व्यक्ती केली. प्रकल्प गुजरातकडे गेला हे महाराष्ट्रातल्या तरुणांचं दुर्दैव आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राची आर्थिक प्रगती ही औद्योगिकीकरणामुळे झाली आहे, असंही आव्हाड म्हणाले. त्याचसोबत चंद्रशेखर बावनकुळे आणि राज ठाकरे यांची सुद्धा आज नागपूरमध्ये भेट झाली. त्यावर आव्हाड म्हणाले, राज ठाकरेंना भेटायला सर्वच पक्षांचे नेते येतात. त्यांच्या मनात काय आहे, हे कुणीच ओळखू शकत नाही. त्याचबरोबर सध्या राज्यात दसरा मेळाव्यावरून राजकारण रंगताना दिसत आहे. त्याबाबत आव्हाड म्हणाले कोण कुठे मेळावा घेणार हे ठरलं, पण शेवटी निवडणुकीत जनता काय ते ठरवेल.

The opposition targeted the government after the Vedanta project moved from Maharashtra to Gujarat. Similarly, NCP MLA Jitendra Awad also expressed regret over this. It is the misfortune of the youth of Maharashtra that the project of Maharashtra has gone to Gujarat. At the same time, Awad said that the economic progress of Maharashtra is due to industrialization.

- Advertisement -