घरव्हिडिओलसीकरणअभावी कल्याण-डोंबिवलीकर त्रस्त

लसीकरणअभावी कल्याण-डोंबिवलीकर त्रस्त

Related Story

- Advertisement -

कोरोना पासून वाचण्यासाठी सध्या लसीकरण हा एकमेव पर्याय आहे, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. पण, कल्याण डोंबिवली यासह अनेक भागांमध्ये लसींचा साठाच उपलब्ध नाही. त्यामुळे लसीकरण मोहिमेला ब्रेक लागला आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात २५ लसीकरण केंद्र आहेत. गेल्या दोन दिवसांपासून लस उपलब्ध नसल्याने कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील सर्व लसीकरण केंद्र पूर्णपणे बंद आहेत. अनेक नागरिक लसीकरणासाठी येऊन लस न घेता जात आहेत. वारंवार लसीकरण केंद्रावर फेरी मारून देखील लस मिळत नसल्याने कल्याण-डोंबिवली मधील सर्व नागरिक त्रस्त झाले असून लवकरात लवकर प्रशासनाने लसीकरण सुरू केले पाहिजे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे

- Advertisement -