घरमुंबईबाबासाहेब पुरंदरे यांनी ९७ व्या वर्षी बजावला मतदानाचा हक्क

बाबासाहेब पुरंदरे यांनी ९७ व्या वर्षी बजावला मतदानाचा हक्क

Subscribe

बाबासाहेब पुरंदरे यांनी वयाच्या ९७ व्या वर्षी मतदानाचा हक्क बजावला आहे.

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाला सकाळी ७ वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. राज्यातील ३ हजार २३७ उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार असून राज्य विधानसभेच्या २८८ जागांवर मतदान पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर अनेक दिग्गजांनसह सेलिब्रेटींनीही आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. तर पुण्यातील पर्वती येथे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला आहे. वयाच्या ९७ व्या वर्षीही बाबासाहेब पुरंदरे यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.

मतदान करणे एक प्रकारचा आनंद

मतदान करणे हा आपला हक्क असून सर्वांने आपले कर्तव्य बजावले पाहिजे. याच भावनेने मी आलो आहे. मतदान करा म्हणून कोणीही मला जबरदस्ती केली नाही. तसेच कोणीही याकरता मला पैसे दिले नाही. तसेच मतदान हा एक प्रकारचा आनंद असतो, असे मत बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केले आहे.

- Advertisement -

कोणतेही क्षेत्र असो मात्र, पुढचे पाऊल पडले पाहिजे. आपण मागे वळून न पाहता आपण नेहमी पुढे चालत राहिले पाहिजे‘, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. तसेच मेरा भारत महान ट्रकपुरते राहू नये, हे संपूर्ण देशासाठी लागू असले पाहिजे असेही त्यांनी सांगितले आहे.


हेही वाचा – पहिल्या ४ तासात रत्नागिरीची बाजी; सर्वाधिक ६२.५० टक्के मतदान!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -