घरमनोरंजन#Tanhaji : अजय देवगणचा फर्स्ट लूक रिलीज!

#Tanhaji : अजय देवगणचा फर्स्ट लूक रिलीज!

Subscribe

मराष्ट्राचा अभिमानास्पद इतिहास सांगणारी शूरवीराची गाथा, तानाजी मालुसरे या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मावळ्याची गोष्ट लवकरच रुपेरी पडद्यावर येणार आहे. अभिनेता अजय देवगण ही ऐतिहासिका भूमिका साकारणार असून या हिंदी बनणारा हा चित्रपट पुढील वर्षात २० जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. या मोस्ट अवेटेड चित्रपटाचा फर्स्ट लुक आज सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला असून तानाजीच्या भूमिकेतील अजय देवगण यांचे पोस्टर शेअर करण्यात आले आहे.

- Advertisement -

या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले असून बऱ्याच कालावधीनंतर रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांना अजय आणि काजोलची जोडी एकत्र पाहायला मिळणार आहे. काजोलने या चित्रपटात तानाजींच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. तर अभिनेता सैफ अली खानदेखील चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -