घरमहाराष्ट्ररक्ताचे नातलग एकमेकांविरोधात रिंगणात

रक्ताचे नातलग एकमेकांविरोधात रिंगणात

Subscribe

राजकारणात राजकीय महत्त्वाकांक्षा वाढली की, त्यासमोर काहीही दिसत नाही, अगदी रक्ताची नातीही त्यासमोर धुसर बनतात, याचा अनुभव सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीत येत आहे. भाजपने सत्तेच्या महत्त्वाकांक्षेपोटी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांतील दिग्गज नेत्यांना फोडून त्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला. शिवसेनेनेही तोच कित्ता गिरवला. अशा वेळी दोन्ही काँग्रेसने मग संबंधित फुटीर उमेदवाराच्या घरातील सदस्यालाच त्या उमेदवाराच्या विरोधात तिकीट देऊन अनेक ठिकाणी घराघरात रक्ताच्या नात्यांमध्ये उभी फूट पाडली आहे. अशा रक्तातील नातलगांमध्ये सध्या राज्याची विधानसभा निवडणूक रंगात आली आहे.

सध्या भाजप-शिवसेनेचे पारडे जड झाल्यामुळे दोन्ही काँग्रेसमधील नेत्यांनी राजीखुशी रामराम ठोकत कुणी कमळ तर कुणी धनुष्यबाण हाती घेतला. दोन्ही काँग्रेसमध्ये ३-४ दशके राजकारण करणारी घराणे दोन्ही काँग्रेसमधील बरीच आहेत. त्या सर्व घराघरांमध्ये ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, महापालिका, आमदार आणि खासदार या सर्व सत्ता आहेत. अशा वेळी बलाढ्य भाजपविरोधात दोन्ही काँग्रेसमधील प्रसथापित घराण्यांनी अक्षरश: तलवार म्यान करत भाजपच्या वळचळणीला गेला. अशा वेळी जिल्ह्याचे राजकारण संभाळण्यासाठी त्या त्या घराण्यातील दुसरे सदस्य पुढे आली आहेत. त्यामुळे रक्तातील नातलगांमध्येच आता निवडणुकीची चुरस निर्णाण झाली आहे.

- Advertisement -

यात बीडमधील पंकजा मुंडे यांच्या विरोधात धनंजय मुंडे यांच्या उमेदवारीने विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. हे दोघे जण सख्खे चुलत बहीण – भाऊ आहेत. तर लातूर येथे विद्यमान मंत्री संभाजी पाटील निलंगेकर (भाजप) विरुद्ध अशोक पाटील निलंगेकर (काँग्रेस) – निलंगा यांची लढत होणार आहे. हे दोघे जण चुलते पुतणे आहेत. तर दुसरीकडे माण, सातारामध्ये जयकुमार गोरे (भाजप) विरुद्ध शेखर गोरे (शिवसेना) हे सख्खे भाऊ यांच्यात चुरशीचा लढत होणार आहे. तर बीडमधून जयदत्त क्षीरसागर (शिवसेना) विरुद्ध संदीप क्षीरसागर (राष्ट्रवादी) या चुलते-पुतणे यांच्यात लढत होणार आहे.यवतमाळ, पुसदमध्ये इंद्रनील नाईक (भाजप) यांच्या विरोधात निलय नाईक (राष्ट्रवादी) – पुसद, यवतमाळ हे चुलत भाऊ एकमेकांविरोधात दंड थोपटून उभे आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -