घरमुंबईयशवंत जाधव - मनोज जामसुतकर पॅचअप

यशवंत जाधव – मनोज जामसुतकर पॅचअप

Subscribe

काँग्रेसचे माजी नगरसेवक जामसुतकर शिवसेनेत

माझगावमधील शिवसेना नगरसेवक व स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव आणि काँग्रेस माजी नगरसेवक माजी नगरसेवक मनोज जामसुतकर यांच्यातील वैर अखेर संपुष्टात आले. मागील अनेक वर्षांपासून या दोघांमध्ये वैर होते. परंतु, जामसुतकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे जाधव यांच्याशी असलेले वैर संपुष्टात आलेले असून भायखळ्याच्या युतीच्या उमेदवार यामिनी जाधव यांची ताकद अधिक वाढली आहे.

माझगावमधील माजी नगरसेवक मनोज जामसुतकर, माजी नगरसेवक सुर्यकांत पाटील तसेच माजी नगरसेविका सुनीता पाटील यांनी कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. विशेष म्हणजे यामधील माजी नगरसेवक जामसुतकर यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. जामसुतकर यांच्या पत्नी सोनम या काँग्रेसच्या नगरसेविका आहेत.भायखळा मतदार संघातून स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या पत्नी माजी नगरसेविका यामिनी जाधव या निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. परंतु जाधव यांना जामसुतकर यांचीच अधिक भीती होती. जामसुतकर हे स्वत: इच्छुक उमेदवार होते. परंतु त्यांचे तिकीट पक्षाने कापून माजी आमदार मधु चव्हाण यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे ते नाराज झाले होते.

- Advertisement -

परंतु यशवंत जाधव यांच्याशी असलेल्या वैरामुळे त्यांनी मधु चव्हाण यांना मदत केल्यास मोठ्याप्रमाणात मते वळली जाण्याची शक्यता होती. त्यामुळे हा धोका लक्षात घेता, यशवंत जाधव यांनी माजी नगरसेवक सुर्यकांत पाटील आणि जामसुतकर यांचे बंधू यांच्या माध्यमातून मनोज जामसुतकर यांचे मन परिवर्तन करत मैत्रीचा हात पुढे करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे दसर्‍याला या भागातील काहींचा प्रवेश शिवसेनेत झाल्यानंतर, मातोश्रीवर जामसुतकर यांच्या प्रवेशाची विचारणा यशवंत जाधव यांनी केली. त्यातच जामसुतकर हे शिवसेनेचे सचिव सुरज चव्हाण यांच्याशी त्यांची मैत्री असल्याने, त्यांच्या प्रवेशाला मातोश्रीने यशवंत जाधव यांच्या विनंतीनुसार हिरवा दिवा दाखवला. त्यानुसार जामसुतकर यांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आणि गुरुवारी सकाळी जामसुतकर यांच्यासह दोन माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला.

चव्हाणांची डोकेदुखी वाढणार

- Advertisement -

जामसूतकर यांच्या प्रवेशामुळे माझगावमध्ये शिवसेना अधिक मजबूत झाली असून यशवंत जाधव यांच्या डोक्यावरील टेन्शनही कमी झाल्याचे बोलले जात आहे. यशवंत जाधव यांच्या विनंतीनुसार जामसूतकर यांचा प्रवेश झाल्यामुळे यशवंत जाधव आणि जामसुतकर हे दोन्ही हंसो की जोडी आता माझगावमध्ये फिरताना दिसणार आहे. त्यामुळे मधु चव्हाण यांची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे एमआयएमचे वारीस पठाण विरुध्द यामिनी जाधव यांच्या प्रमुख लढत होणार आहे. याठिकाणी आधीच मतांची विभागणी होवू नये म्हणून मनसेने उमेदवार दिलेला नाही. त्यामुळे काँग्रेसचे मधु चव्हाण आणि अभासेच्या गीता गवळी या किती मुस्लीम मते मिळवतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -