घरमुंबईमुंबईच्या डबेवाल्यांना हवा शिवसेनेचा मुख्यमंत्री

मुंबईच्या डबेवाल्यांना हवा शिवसेनेचा मुख्यमंत्री

Subscribe

शिवसेनेने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत एकत्र येऊन आपला मुख्यमंत्री बनवावा, असा सल्ला मुंबईच्या डबेवाल्यांनी शिवसेनेला दिला आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेले राजकीय नाट्य काही केल्या संपताना दिसत नाही. निवडणूक निकालाच्या आठवडाभरानंतरही शिवसेना-भाजपचा सत्ता स्थापनेचा तिढा अजूनही सुटलेला दिसत नाही. दोन्ही पक्ष मुख्यमंत्रीपदावर अडून बसले आहेत. त्यामुळे सत्ता स्थापनेचा पेच सुटणे कठीण होत चालल आहे. यामुळे शिवसेना आणि भाजपामध्ये जोरदार सत्ता वाद सुरु झाला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर देखील ट्रोल केले जात आहे. त्यामुळे भाजप महत्त्व देत नसल्यास ‘कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा’, असे म्हणत शिवसेनेला भाजपाशिवाय सत्ता स्थापन करा असा सल्ला मुंबईच्या डबेवाल्यांनी दिला आहे. तसेच शिवसेनेने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत एकत्र येऊन आपला मुख्यमंत्री बनवावा, असा मोलाचा सल्ला देखील शिवसेनेला दिला आहे.

डबेवाल्यांचा मोलाचा सल्ला

शिवसेनेने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोबत घेऊन सरकार स्थापन करावे, अशी मागणी मुंबईतील डबेवाल्यांनी केली आहे. महायुतीला बहुमत मिळाले; मात्र निवडणुकीचा निकाल लागून आठवडा झाला तरी, सरकार स्थापन होत नसल्याचे दिसत आहे. भाजप शिवसेनेला महत्त्व देत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शिवसेनेने अपमान सहन करुन घेऊ नये. सत्तास्थापनेसाठी शिवसेनेने गरज भासल्यास कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची मदत घ्यावी. मात्र, भाजपची चुकूनही मदत घेऊ नये, असा मोलाचा सल्ला मुंबईच्या डबेवाल्यांनी शिवसेनेला दिला आहे.

- Advertisement -

डबेवाले शिवसेनेच्या पाठीशी

मुंबईच्या डबेवाल्यांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना – भाजपाचा प्रचार केला. मात्र, आता निकालानंतर भाजप वेगळे वागत आहे. त्यामुळे शिवसेनेने आपला मुख्यमंत्री बनवावा मात्र, भाजपाला संधी देऊ नये. मागील वेळी शिवसेनेने देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला पाठिंबा दिला होता. मात्र, आता ते शिवसेनेला पाणी पाजण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपचा भस्स्मासुर मित्रपक्षांना संपवतो आहे. त्यामुळे हा भस्स्मासुर शिवसेनेच्या डोक्यावरही बसेल. – सुभाष तळेकर; मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष


हेही वाचा – ‘ढाण्यावाघ एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होवोत’; ठाण्यात बॅनरबाजी

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -