घरमुंबईशिवसेनेचे संख्या'बळ' वाढतंय; नेवासाच्या अपक्ष आमदाराचा जाहीर पाठिंबा

शिवसेनेचे संख्या’बळ’ वाढतंय; नेवासाच्या अपक्ष आमदाराचा जाहीर पाठिंबा

Subscribe

शिवसेनेला नेवासा विधानसभा मतदार संघाचे अपक्ष आमदारशकराव गडाख यांनी बिनशर्त पाठिंबा दर्शवला आहे.

विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आणि पक्षांची आपापले संख्याबळ वाढवण्याची लगबग सुरु झाली. राज्यात २८८ मतदारसंघांमध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या. कोणत्याही पक्षाला बहुमताचा आकडा पार करता आला नसला तरी पुन्हा एकदा महायुतीचे सर्वाधीक आमदार निवडणूक आले आहेत. त्यातच शिवसेना पक्षालाही राज्यातून पाठिंबा वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. आज, सोमवारी शिवसेनेला नेवासा विधानसभा मतदार संघाचे अपक्ष आमदार
शकराव गडाख यांनी बिनशर्त पाठिंबा दर्शवला आहे. आज मातोश्रीवर जाऊन अपक्ष आमदार शंकरराव गडाख यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली.

मिलिंद नार्वेकर

शिवसेनेची संख्या ६१ वर 

निकालानंतर शिवसेनेचे ५६ आमदार निवडून आले होते. मात्र आतापर्यंत ५ अपक्ष आमदारांच्या पाठिंब्यामुळे शिवसेनेचे संख्याबळ ६१ वर पोहचले आहे. शिवसेनेचे सचिव मिलींद नार्वेकर यांनी आज नेवासा मतदारसंघाचे आमदार शंकरराव गडाख यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. यावेळी शंकरराव गडाख यांचे वडिल यशवंतराव गडाख आणि बंधू प्रशांत गडाख देखील उपस्थित होते. उपस्थित सर्वांशी चर्चा केल्यावर मिलींद नार्वेकर यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून गडाख कुटुंबाशी चर्चा करून दिली. त्यानंतर शंकरराव गडाख आणि प्रशांत गडाख यांना मिलींद नार्वेकर यांनी तात्काळ मुंबईत मातोश्रीवर आणलं आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रत्यक्ष भेट करून दिली. यावेळी शंकरराव गडाख यांनी शिवसेनेला अधिकृत पाठिंबा देत असल्याचे पत्र शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना दिले.

- Advertisement -

मिलिंद नार्वेकर गेले गडाख यांच्या घरी

शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी शंकरराव गडाख यांच्या घरी पाडव्यानिमित्त सदिच्छा भेट दिली. यावेळी यशवंतराव गडाख यांचे आशीर्वाद घेतले व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे यशवंतराव गडाख यांच्याशी फोनवरून बोलणे करून दिले. उद्धव ठाकरे यांनीही संपूर्ण गडाख कुटुंबाला पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.

या अपक्षांनी दिला शिवसेनेला पाठिंबा

  • भंडारा मतदारसंघ – आमदार नरेंद्र भोंडेकर
  • रामटेक मतदारसंघ – आमदार आशिष जयस्वाल
  • अचलपूर मदारसंघ – आमदार बच्चू कडू
  • मेळघाट मतदारसंघ – आमदार राजकुमार पटेल
  • नेवासा मतदारसंघ – आमदार शंकरराव गडाख

हेही वाचा –

मतांची आकडेवारी – काँग्रेस-राष्ट्रवादी-वंचित एकत्र असते, तर भाजप संकटात होता!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -