घरमहाराष्ट्रमतांची आकडेवारी - काँग्रेस-राष्ट्रवादी-वंचित एकत्र असते, तर भाजप संकटात होता!

मतांची आकडेवारी – काँग्रेस-राष्ट्रवादी-वंचित एकत्र असते, तर भाजप संकटात होता!

Subscribe

वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत न केलेली आघाडी ही भाजप-शिवेनेच्या पथ्यावर पडली आहे. ही आघाडी झाली असती, तर भाजप-शिवसेनेला विरोधात बसवण्याची संधी महाआघाडीला मिळाली असती हे आता आकडेवारीवरून स्पष्ट झालं आहे.

विधानसभा निवडणुकांनंतर आता आलेल्या निकालांचं वेगवेगळ्या पद्धतीने विश्लेषण केलं जात आहे. शिवसेना-भाजप युती, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी, वंचित बहुजन आघाडी, मनसे आणि इतर छोटे पक्ष अशी प्रामुख्याने ही निवडणूक झाली.
निवडणुकीनंतर आलेल्या निकालांनुसार भाजप – १०५, शिवसेना – ५६ (युती – १६१), राष्ट्रवादी काँग्रेस – ५४, काँग्रेस – ४४(आघाडी – ९८), मनसे – १, वंचित – ० आणि इतर २८ अशी अंतिम आकडेवारी समोर आली आहे. त्यामुळे सेना-भाजप महायुतीला सत्तास्थापनेची संधी जरी मिळाली असली, तरी जर वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस-राष्ट्रवादीची जर आघाडी झाली असती, तर सेना-भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात या आघाडीला यश मिळालं असतं, असं निकालांवरून
स्पष्ट होत आहे!

निकालांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास किमान ३० असे मतदारसंघ आहेत, जिथे काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने मिळून शिवसेना किंवा भाजपच्या विजेत्या ३० उमेदवारांपेक्षा जास्त मतं घेतली
आहेत. त्यामुळे या ३० जागा जर आघाडीकडे आल्या असत्या, तर आज राज्यातलं वातावरण पूर्णपणे वेगळं दिसू शकलं असतं.

- Advertisement -

वंचितने गमावलेले ५ मतदारसंघ

बुलढाणा (सेना-६७,७८५/वंचित-४१,७१०/काँग्रेस-३१,३१६)
अकोट (भाजप-४८,५८६/वंचित-४१,३२६/काँग्रेस-२७,५०१)
मूर्तिजापूर (भाजप-५९,५२७/वंचित-५७,६१६/राष्ट्रवादी-४१,१५५)
वाशिम (भाजप-६६,१५९/वंचित-५२,४६४/काँग्रेस-३०,७१६)
कळमनुरी (सेना-८२,५१५/वंचित-६६,१३७/काँग्रेस-५७,५४४)

काँग्रेसने गमावलेले १४ मतदारसंघ

चाळीसगाव (भाजप-८६,५१५/रा. काँग्रेस-८२,२२८/वंचित-३८,४२९)
चिखली (भाजप-९३,५१५/काँग्रेस-८६,७०५/वंचित-९,६१६)
खामगाव (भाजप-९०,७५७/काँग्रेस-७३,७८९/वंचित-२५,९५७)
अकोला (प) (भाजप-१,००,४७५/काँग्रेस-९,५३३/वंचित-७५,७५२)
धामणगाव (भाजप-९०,८३२/काँग्रेस-८१,३१३/वंचित-२३,७७९)
दक्षिण नागपूर (भाजप-८४,३३९/काँग्रेस-८०,३२६/वंचित-५५८३)
बल्लारपूर (भाजप-८६,००२/काँग्रेस-५२,७६२/वंचित-३९,९५८)
चिमूर (भाजप-८७,१४६/काँग्रेस-७७,३९४/वंचित-२४,४७४)
राळेगाव (भाजप-९०,८२३/काँग्रेस-८०,९४८/वंचित-१०,७०५)
अर्णी (भाजप-८१,५९९/काँग्रेस-७८,४४६/वंचित-१२,३०७)
फुलम्ब्री (भाजप-१,०६,१९०/काँग्रेस-९०,९१६/वंचित-१५,२५२)
चेंबूर (सेना-५३,२६४/काँग्रेस-३४,२१६/वंचित-२३,१७८)
पुणे कँटोन्मेंट (भाजप-५२,१६०/काँग्रेस-४७,१४८/वंचित-१०,०२६)
तुळजापूर (भाजप-९९,०३४/काँग्रेस-७८,८६५/वंचित-३५,३८३)

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसने गमावलेले ११ मतदारसंघ

किनवट (भाजप-८९,६२८/रा. काँग्रेस-७६,३५६/वंचित-११,७६४)
जिंतूर (भाजप-१,१६,९१३/रा. काँग्रेस-१,१३,१९६/वंचित-१३,१७२)
पैठण (शिवसेना-८३,४०३/रा. काँग्रेस-६९,२६४/वंचित-२०,६५४)
नांदगाव (शिवसेना-८५,२७५/रा. काँग्रेस-७१,३८६/वंचित-१३,६३७)
उल्हासनगर (भाजप-४३,६६६/रा. काँग्रेस-४१,६६२/वंचित-५६८९)
दौंड (भाजप-१,०३,६६४/रा. काँग्रेस-१,०२,९१८/वंचित-२६३३)
खडकवासला (भाजप-१,२०,५१८/रा. काँग्रेस-१,१७,९२३/वंचित-५९३१)
गेवराई (भाजप-९९,६२५/रा. काँग्रेस-९२,८३३/वंचित-८३०६)
उस्मानाबाद (शिवसेना-८७,४८८/रा. काँग्रेस-७४,०२१/वंचित-१५,७५५)
माळशिरस (भाजप-१,०३,५०७/रा. काँग्रेस-१,००,९१७/वंचित-५५३८)
परंडा (शिवसेना-१,०६,६७४/रा. काँग्रेस-७३,७७२/वंचित-२७,९३९)

या जागा आघाडीकडे आल्या असत्या तर…

रा. काँग्रेस – ५४ + ११ – ६६
काँग्रेस – ४४ + १४ – ५८
वंचित – ० + ५ – ५
एकूण – १२९

वरची आकडेवारी पाहिली, तर राष्ट्रवादीच्या ११, काँग्रेसच्या १४ तर वंचितच्या ५ जागा वाढल्या असत्या.

सेना-भाजपने या जागा गमावल्या असत्या तर…

शिवसेना (५६ – ७) – ४७
भाजपा (१०५ – २३) = ८२
एकूण – १२९

तर दुसरीकडे शिवसेनेने ७ जागा तर भाजपने २३ जागा गमावल्या असत्या. त्यामुळे अर्थातच काँग्रेस-राष्ट्रवादी-वंचित आघाडीची एकत्रित आमदारांची संख्या १२९ तर दुसरीकडे भाजप-शिवसेना महायुतीच्या एकत्रित आमदारांची संख्या देखील १२९च झाली असती. त्यामुळे सत्तास्थापनेची दोघांना देखील समान संधी उपलब्ध असती. या पार्श्वभूमीवर मनसेच्या एका आमदाराचा पाठिंबा काँग्रेस-राष्ट्रवादीला मिळाला असता. त्यांची संख्या १३० झाली असती. त्या वेळी इतर २८ आमदारांची भूमिका फारच महत्त्वाची ठरली असती. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडी याची आघाडी न झाल्यामुळे सत्तास्थापनेची संधीच विरोधकांनी दवडली असंच चित्र या आकडेवारीवरून दिसून येत आहे.

एक प्रतिक्रिया

टिप्पण्या बंद आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -