घरमुंबईनितेश राणे म्हणतात 'वादळापूर्वीची शांतता, फक्त काही तास बाकी'!

नितेश राणे म्हणतात ‘वादळापूर्वीची शांतता, फक्त काही तास बाकी’!

Subscribe

नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाला अद्याप मुहूर्त मिळत नसताना त्यांचे पुत्र नितेश राणे यांनी 'फक्त काही तास बाकी' असं ट्वीट करून या मुद्द्याभोवती सस्पेन्स अजून वाढवला आहे.

एकीकडे शिवसेना-भाजप उमेदवारांच्या याद्या जाहीर होत असतानाच दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीकडून देखील उमेदवारांची घोषणा केली जात आहे. मात्र, या सगळ्यामध्ये राणे कुटुंबीय कुठेच नव्हते. नारायण राणे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा अनेकदा रंगल्या. खुद्द राणेंनी देखील ‘मी भाजपमध्ये प्रवेश करणार आहे, मुख्यमंत्री तारीख जाहीर करतील’, अशी वक्तव्य केली जात होती. भाजपकडून मात्र यासंदर्भात कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर केली जात नव्हती. या सगळ्या पार्श्वभूमीवर सेना-भाजपच्या याद्या जाहीर होत असताना राणेंकडून कोणतंही वक्तव्य केलं जात नव्हतं. मात्र, नारायण राणेंचे पुत्र नितेश राणे यांच्या एका ट्वीटमुळे नारायण राणेंचा भाजप प्रवेश नक्की होणार का? आणि झाला तर कधी? याविषयी संभ्रम कायम आहे.

काय आहे ट्वीट?

नितेश राणेंनी मंगळवारी रात्री ११ वाजता त्यांच्या अकाऊंटवरून हे ट्वीट केलं. यामध्ये नितेश राणे म्हणतात, ‘फक्त काही तास बाकी (वादळापूर्वीची शांतता)’. नितेश राणेंच्या या ट्वीटचे अनेक अर्थ काढले जात आहेत. ‘वादळापूर्वीची शांतता’ असं म्हणणाऱ्या नितेश राणेंना नक्की काय सूचित करायचं आहे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

- Advertisement -


हेही वाचा – मनसे आदित्य ठाकरेंसाठी वरळीत उमेदवार देणार नाही!

भाजपवासी राणेंचा शिवसेना प्रचार करणार?

नारायण राणे जरी भाजपमध्ये जाण्यासाठी इच्छुक असले आणि भाजपदेखील त्यांना घेण्यासाठी तयार असली, तरी शिवसेनेकडून राणेंच्या नावाला नापसंती दर्शवली जात आहे. या पार्श्वभूमीवर राणेंना भाजपमध्ये घेण्याचा अद्याप मुहूर्त मिळताना दिसत नाहीये. दरम्यान, राणेंच्या ऐवजी त्यांचे पुत्र नितेश राणे यांना थेट पक्षात न घेता फक्त एबी फॉर्म देऊन पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढण्यास सांगितलं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे राणेंचा खरंच भाजप प्रवेश होणार का? झाला, तर युतीचा उमेदवार म्हणून स्वत: राणे किंवा त्यांचे पुत्र नितेश राणे यांचा प्रचार शिवसेनेचे कणकवली आणि आसपासचे स्थानिक नेते करणार का? हे प्रश्न आता डोकं वर काढू लागले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -