घरविधानसभा २०१९मुंबई उपनगर जिल्ह्यातील मतदार संख्येत झाली लाखोंची वाढ

मुंबई उपनगर जिल्ह्यातील मतदार संख्येत झाली लाखोंची वाढ

Subscribe

मुंबई उपनगर जिल्ह्यातील मतदार संख्येत १ लाख १५ हजार ५९० एवढी वाढ झाली असून जिल्ह्यातील एकूण मतदार संख्या ही ७२ लाख ६३ हजार २४९ इतकी आहे. तर महिला मतदारांच्या संख्येत १.७८ तर पुरुष मतदारांच्या संख्येत १.४८ टक्क्यांची वाढ झाली आहे.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९’ निवडणुकीच्या अनुषंगाने मतदार संघ आणि मतदार संख्या यांचा विचार करता ‘मुंबई उपनगर जिल्हा’ हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे. या निवडणुकीकरीता मतदार नोंदणीची अद्ययावत आकडेवारी नुकतीच उपलब्ध झाली आहे. यानुसार विधानसभा निवडणुकीसाठी ७२ लाख ६३ हजार २४९ एवढी मतदार संख्या आहे. यामध्ये ३९ लाख ४७ हजार ३८५ पुरुष, ३३ लाख १५ हजार ३३६ महिला आणि ५२८ इतर मतदारांचा समावेश आहे. मे २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत जिल्ह्यातील मतदारांच्या संख्येत १ लाख १५ हजार ५९० एवढी अर्थात १.६२ टक्के एवढी वाढ झाली आहे. तसेच यानुसार महिला मतदारांच्या संख्येत झालेली वाढ १.७८ टक्के असून पुरुष मतदारांच्या संख्येत झालेली वाढ १.४८ टक्के आहे. तर मुंबई उपनगर जिल्हा प्रशासनाद्वारे मतदार नोंदणीसाठी सातत्याने आणि प्रभावीपणे राबविलेल्या जनजागृतीमुळे जिल्ह्यातील मतदार संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.

सर्वात अधिक मतदार संख्येची नोंद

अद्ययावत आकडेवारीनुसार २६ मतदार संघापैकी सर्वात अधिक म्हणजेच ३ लाख ७९ हजार २७९ मतदार हे चांदिवली मतदार संघात आहेत. तर या खालोखाल गोरेगाव मतदार संघात ३ लाख २७ हजार ८९९ आणि अंधेरी (पश्चिम) मतदार संघात ३ लाख ६ हजार २११ एवढी मतदार संख्या नोंदविण्यात आली आहे.

- Advertisement -

सर्वात कमी मतदार संख्येची नोंद

सर्वात कमी म्हणजे २ लाख ३१ हजार ४७ एवढे मतदार विक्रोळी मतदार संघात आहेत.
मुंबई उपनगर जिल्ह्यात मे २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकी दरम्यानच्या मतदार यादीनुसार महिला मतदारांची संख्या ही ३२ लाख ५७ हजार २६८ एवढी होती. या मतदार संख्येत आता ५८ हजार ६८ एवढी संख्यात्मक वाढ झाली असून ती आता ३३ लाख १५ हजार ३३६ एवढी झाली आहे असून १.७८ टक्के वाढ झाली आहे.

पुरुष मतदारांची संख्या

पुरुष मतदारांची संख्या ३८ लाख ८९ हजार ८७५ एवढी होती. या मतदार संख्येत आता ५७ हजार ५१० एवढी वाढ झाली असून ती आता ३९ लाख ४७ हजार ३८५ एवढी झाली असून १.४८ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

- Advertisement -

इतर मतदारांची संख्या

इतर मतदारांची संख्या ही मे २०१९ मध्ये ५१६ एवढी होती, जी आता ५२८ एवढी झाली आहे. तर २.३३ टक्के इतकी वाढ झाली आहे. या वर्गवारीतील सर्वाधिक म्हणजे २९३ मतदार हे मालाड (पश्चिम) मतदार संघात आहेत.

जनगणना २०११ नुसार मुंबई उपनगर जिल्ह्याची लोकसंख्या ९३ लाख ५६ हजार ९६२ एवढी होती. यामध्ये ५० लाख ३१ हजार ३२३ पुरुषांचा, तर ४३ लाख २५ हजार ६३९ महिलांचा समावेश होता. सदर जनगणनेनुसार लोकसंख्येची घनता ही प्रति चौरस किलोमीटर २० हजार ९८० एवढी होती. तर २०१९ मध्ये मुंबई उपनगर जिल्ह्याची अंदाजित लोकसंख्या सुमारे १ कोटी १ लाख ६३ हजार ४२४ असल्याचा अंदाज आहे.


हेही वाचा – ठाण्यात वॉटरप्रुफ मतदानकेंद्रावर होणार मतदान


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -