घरमुंबईराज ठाकरेंनी पुन्हा साधला ९ तारखेचा मुहूर्त; जाहीर सभा लांबणीवर

राज ठाकरेंनी पुन्हा साधला ९ तारखेचा मुहूर्त; जाहीर सभा लांबणीवर

Subscribe

मनसे पुन्हा एकदा निवडणुकीसाठी सज्ज झाली असून निवडणुकीतील रणनितीची माहिती आपण स्वत: येत्या जाहीर सभेत देऊ, असे वक्तव्य काल, सोमवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले होते. येत्या ५ ऑक्टोबर रोजी मनसेची जाहीर सभा होणार, असे राज ठाकरे म्हणाले होते. मात्र, आता ही सभा पुढे ढकलली असून बुधवारी ९ ऑक्टोबरला त्यांची पहिली सभा होणार असल्याचे सांगितले जात आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे पानिपत झाल्यानंतर यंदाची निवडणूक मनसे लढवणार का? याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. मात्र, काल झालेल्या कार्यक्रमात स्वत: राज ठाकरे यांनी मनसे निवडणूक लढवणार, असे जाहीर करुन सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. त्याशिवाय आज मनसेने २७ उमेदवारांची यादी जाहीर केली.

राज ठाकरे आणि ९ आकडा

सोमवारी झालेल्या पक्षप्रवेश मेळाव्यात राज यांनी आपण ५ ऑक्टोबरपासून प्रचार सभा घेणार असल्याचे सांगितले होते. परंतु, आता त्यांनी प्रचाराचा मुहूर्त ९ ऑक्टोबरचा ठरवला आहे. ९ आकडा आणि राज ठाकरे यांची राजकीय कारकिर्द यांचा जवळचा संबंध आहे. राज ठाकरे यांना हा क्रमांक स्वतःसाठी लकी आहे, असे मानतात. त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घडामोडी ९ आकड्याशी संबंधित आहेत. ९ आकड्याशी नेहमीच त्यांचा एक जवळचा संबंध राहिला आहे. राज ठाकरेंनी शिवसेनेचे नेतेपद २७ डिसेंबर २००५ला सोडले. शिवसेनेला सोडचिठ्ठी १८ जानेवारी २००६ रोजी दिली. मनसेची स्थापना त्यांनी ९ मार्च २००६ रोजी केली. इतकेच काय टेलिकॉम कंपन्यांना मराठीत सेवा द्यायला २७ फेब्रुवारी २०१० रोजी बजावले. राज ठाकरेंच्या मुलाच्या लग्नाची तारीखही २७ जानेवारी होती. महत्त्वाची वेळ म्हणजे लग्नाचा मुहूर्त होता १२ वाजून ५१ मिनिटांचा. राज ठाकरेंकडे असलेल्या सर्व गाड्यांचे क्रमांक ९ आहेत. राजकीय क्षेत्रात वावरणारी मंडळी आकड्यांना फार महत्त्व देतात. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंसाठी निवडणुकीच्या दृष्टीने जुळून आलेला योग कितीपत लकी ठरतो, हे निवडणुकीच्या पक्षाच्या यशानंतर समजेल.

- Advertisement -

संदीप देशपांडे यांना माहिममधून उमेदवारी

विधानसभा निवडणुकीसाठी मनसेची पहिली यादी जाहीर झाली आहे. या पहिली यादीत २७ उमेदवारांची नावे घोषित  करण्यात आली आहेत. यामध्ये मनसेचे नेते संदीप देशपांडे यांना माहिम मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे. तर मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना ठाणे विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर झाली आहे. यासोबतच कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघासाठी राजू पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्याचबरोबर अखिल चित्रे यांना वांद्रे पूर्व मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे. मंगळवारी संध्याकाळी मनसेचे नेते शिरीष सावंत यांनी ही यादी जाहीर केली आहे.

मनसेने घोषित केलेल्या उमेदवारांची यादी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -