घरमुंबईउल्हासनगरमधून बिबट्याचे कातडे जप्त; दोन जण अटकेत

उल्हासनगरमधून बिबट्याचे कातडे जप्त; दोन जण अटकेत

Subscribe

जालना व परभणी येथे राहणारे दोन जण उल्हासनगरात बिबटयाचे कातडे विक्री करण्यासाठी आले असताना उल्हासनगर गुन्हे अन्वेशन विभागाच्या पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार शहरातील कॅम्प नं. १ येथील शहाड ब्रिज जवळ २ इसम बिबट्याचे कातडे विक्री करण्यासाठी येणार असल्याची गुप्त माहिती उल्हासनगर गुन्हे शाखा घटक-४ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांना मिळाली होती. त्या माहितीवरून पोलिस अधिकारी मनोहर पाटील, झेंडे, गणेश तोरगल, सुरेंद्र पवार, एस.आय.चव्हाण, उदय पालांडे, पोलीस हवालदार संजय माळी, रामचंद्र जाधव, सुनील जाधव, बाबुलाल जाधव, भोगले या पोलीस पथकाने सापळा रचून शहाड ब्रीजजवळ संशयास्पदरित्या हालचाली करणाऱ्या दोन जणांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याजवळील बॅगेमध्ये बिबट्या या वन्यजीव प्राण्याचे सालून काढलेले कडक व सुकलेले कातडे आढळले.

- Advertisement -

ताब्यात घेतलेल्या त्या दोन इसमांची नावे संतोष हंगारगे (वय २९) व प्रकाश वाटूडे (वय ३७) अशी आहेत. हे दोघे जालना व परभणी येथील राहणारे आहेत. ते बिबट्याचे कातडे विक्री करण्यासाठी आले असल्याचे तपासात समजले आहे. हे कातडे त्यांनी कुठून आणले व कोणाला विकणार होते. याचा अधिक तपास पोलिसांनी सुरू केला आहे. या प्रकरणी पोलीस हवालदार रामचंद्र जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उल्हासनगर पोलिस ठाण्यात संतोष व प्रकाश या दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक तोरगल करत आहेत. अटक आरोपींना आज न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना ५ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -