घरदेश-विदेशकाय होईल, ते सांगू शकत नाही; शरद पवारांचे सूतोवाच!

काय होईल, ते सांगू शकत नाही; शरद पवारांचे सूतोवाच!

Subscribe

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची दिल्लीमध्ये भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये सूचक वक्तव्य केलं आहे. ‘सध्यातरी आमच्याकडे सत्तास्थापनेसाठी आवश्यक संख्याबळ नाही. पण भविष्यात काय होईल, काही सांगू शकत नाही. आम्हाला अद्याप पाठिंब्यासाठी कुणीही विचारलेलं नाही. त्यामुळे त्याविषयी काही माहीत नाही. शिवसेनेने १७० आमदारांच्या पाठिंब्याचा आकडा कुठून आणला माहीत नाही’, असं शरद पवार म्हणाले आहेत. ‘सोनिया गांधींशी भेट घेतली. ए. के. एंटनी देखील उपस्थित होते. राज्यातली परिस्थिती त्यांना विशद करून सांगितली. त्यावर अद्याप आम्ही निर्णय घेतलेला नाही. शिवसेना सामनामधून भाजपविरोधात सातत्याने टीका करत आहे. त्याशिवाय, ते वारंवार म्हणत आहेत की त्यांच्या अटींनुसार सरकार स्थापन व्हावं. या सगळ्याविषयी मी सोनिया गांधींनी माहिती दिली. त्यावर आम्ही असं ठरवलं आहे की पुन्हा एकदा भेटायचं. उद्या मी मुंबईला परतणार आहे. तिथे माझ्या सहकाऱ्यांशी चर्चा करून त्यानंतर पुन्हा मी सोनिया गांधींची भेट घेईन. आजतरी मतदारांनी विरोधात बसण्याचा जनादेश दिला आहे. पण आपण काय होईल ते सांगू शकत नाही. पर्यायी सरकार देण्यासाठी आजतरी आमच्याकडे आवश्यक संख्याबळ नाही’, असं शरद पवार यावेळी म्हणाले.


हेही वाचा – मुख्यमंत्र्यांच्या ‘मी पुन्हा येईन’ला नेटिझन्सचं ‘पुन्हा येऊ नका’ने उत्तर!

शरद पवार मुख्यमंत्री नाहीच!

दरम्यान, यावेळी शरद पवारांनी आपण महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून येणार असल्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. पत्रकारांनी त्यासंदर्भात विचारलं असता पवारांनी त्याला स्पष्टपणे नकार दिला. शिवसेनेसोबत सत्तेत येऊन खुद्द शरद पवार मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. मात्र, त्या चर्चांना खुद्द शरद पवारांनीच पूर्णविराम दिला आहे.

- Advertisement -

शिवसेनेकडून अद्याप कोणताही प्रस्ताव नाही!

शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या पाठिंब्यावर भाजपला दूर ठेऊन राज्यात सत्ता स्थापन करू शकते, असं बोललं जात होतं. मात्र, ‘शिवसेनेकडून पाठिंब्याबाबत अद्याप कोणताही प्रस्ताव आलेला नाही. त्यामुळे त्याविषयी भाष्य करू शकत नाही. शिवाय शिवसेनेने पाठिंब्याच्या १७० आमदारांचा आकडा कुठून काढला, ते माहीत नाही’, असं देखील शरद पवारांनी यावेळी सांगितलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -